महाराष्ट्रात थंडीची लाट अधिक तीव्र होत असून राज्यातील तापमान झपाट्याने घसरत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हवेतल्या गारठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल 5 अंश सेल्सिअसने कमी नोंदवलं गेलं असून दुपारीही थंडीचा प्रभाव कायम आहे. नाशिकमध्ये पारा 9.7 अंशांवर घसरला तर धुळे येथे सर्वात कमी म्हणजे 6.5 अंश तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 7.4 तर परभणीत 8.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईतही सकाळी लक्षणीय गारवा जाणवत असून शहरासह ग्रामीण भागात धुकंही वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस कडाक्याची थंडी वाढण्याचा इशारा (Crisis)दिला आहे.

यासोबतच हवामानात मोठा बदल होत असून काही भागात पावसाची (Crisis)शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 21 ते 24 नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हवामानात ही उलथापालथ होत असल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या पावसानंतर राज्यातील थंडी आणखी वाढू शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होत असल्याने अंदमान आणि निकोबार बेटांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. 21 नोव्हेंबरपासून हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली असून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांना 23 नोव्हेंबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशभरात हवामानातील मोठ्या विरोधाभासामुळे काही भागात कडाक्याची थंडी, काही ठिकाणी पाऊस तर काही प्रदेशात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हवामानातील या सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :
कोरोनाची लागण झालेल्यांच्या रक्तात निर्माण होतायेत गुठळ्या, संशोधनात धक्कादायक खुलासे
आधी विवाहित महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट यायची, त्यानंतर जे घडायचं त्याने…
जयसिंगपूरमध्ये सतेज पाटील, महाडिक, राजू शेट्टी साथ साथ