IPL 2026 चा मेगा ऑक्शन 16 डिसेंबरला अबू धाबीमध्ये रंगणार आहे. अबू धाबीमध्ये 16 डिसेंबरला होणारा मेगा लिलाव यंदा प्रचंड चर्चेत आहे. मागील सीझनमध्ये खेळाडूंवर(player) पैशांची अक्षरशः बरसात झाली होती आणि यंदाही काही असे चेहरे आहेत, ज्यांच्यावर बोली तुटून पडू शकते. या वेळी कोणत्या खेळाडूवर सर्वात मोठी बोली लागेल, याची उत्सुकता फॅन्समध्ये कमालीची आहे. मागील हंगामात ऋषभ पंतला तब्बल 27 कोटींना विकत घेतल्यानंतर या वेळचा ऑक्शन आणखी धमाकेदार होण्याची शक्यता आहे. उपलब्ध स्लॉट फक्त 77 असले तरी ऑक्शन पूल सुपरस्टार आणि टॉप-टॅलेंटने भरलेला आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की या लिलावात एक धडाकेबाज वेस्टइंडीज खेळाडू 30 कोटींचा आकडा सहज पार करू शकतो.

आंद्रे रसेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ग्लेन मॅक्सवेल, डेविड मिलर यांसारखे धडाकेबाज क्रिकेटर्स या लिलावात उतरू शकतात. पण सगळ्यांच्या चर्चेत एकच नाव गरम आहे -आंद्रे रसेल, ज्यावर 30 कोटींपर्यंतची बोली लागू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलला रिलीज केल्यापासून त्यांच्या पुढच्या टीमबाबत चर्चेला उधाण आले आहे. हा निर्णय अनेकांना धक्का देणारा ठरला. कारण रसेलचा अनुभव, क्षमता आणि “X-Factor” आजही कमी झालेला नाही तब्बल 574 T20 सामने, जवळपास 10,000 रन, तसेच 497 विकेट्स रसेलचा हा अनुभव त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघांना एक दमदार ऑलराउंडरची गरज आहे. शिवम दुबे फॉर्ममध्ये असला तरी तो नियमितपणे बॉलिंग करत नाहीत. त्यामुळे रसेलसारखा 3-4 ओव्हर्स टाकणारा, शेवटी येऊन तुफानी फटके मारणारा आणि उत्कृष्ट फील्डिंग करणारा खेळाडू (player)’टोटल पॅकेज’ ठरतो.KKR त्याला परतही घेऊ शकते, पण मोठा पर्स असलेल्या CSKकडून रसेलवर भारी बोली लागण्याची शक्यता जास्त आहे.

हेही वाचा :

इंस्टाग्राम पोस्ट आणि रील्सवरील हॅशटॅग्सवर येणार मर्यादा, जाणून घ्या

तुम्हाला कळत नाही का? मी सांगतोय ना….,’ पोलिसांनी परवानगी नाकारताच अजित पवार संतापले…

अचानक पोलीस आणि डॉग स्क्वॉड पथक आलं, क्रिकेटर स्मृती मानधनाच्या लग्नाला काही तास बाकी असतानाच…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *