तुम्ही देखील कंटेट क्रिएशनमध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल किंवा नुकतेच इंस्टाग्रामवर(Instagram) रिल्स आणि पोस्ट शेअर करून व्हायरल होण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता कंपनी एक असा निर्णय घेण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे नवीन कंटेट क्रिएटर्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खरं तर कंपनी हॅशटॅगच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा विचार करत आहे.

काही क्रिएटर्सने सांगितलं आहे की, ते पोस्ट आणि रिल्स अपलोड करताना 3 हून अधिक हॅशटॅग टाकू शकत नाहीत. अनेक रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये या लिमिटेशनबाबत सांगितलं जात आहे. क्रिएटर्स त्यांची रिल्स आणि पोस्टची रीच वाढावी यासाठी वेगवेगळ्या हॅशटॅगचा वापर करतात. यामुळे त्यांच्या रिल्स आणि पोस्ट वेगवेगळ्या इंटरेस्टवाल्या यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते.

रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकने देखील हॅशटॅगसाठी लिमिट जारी केली आहे. त्यामुळे टिकटॉकवरील क्रिएटर्स आता केवळ 5 हॅशटॅगचा वापर करू शकतात. सध्या सुरु असलेल्या चर्चांमुळे इंस्टाग्राम देखील याच मार्गावर जातोय, असं दिसत आहे. सध्या इंस्टाग्राम(Instagram) पोस्ट आणि रिल्स शेअर करताना 30 हॅशटॅग्सचा वापर केला जाऊ शकतो. मात्र समोर आलेल्या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ही लिमिट 3 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. इंस्टाग्रामने घेतलेल्या या निर्णयामुळे नवीन क्रिएटर्सवर मोठ्या प्रमामात परिणाम होणार आहे, कारण आता या क्रिएटर्सकडे त्यांची रिच वाढवण्यासाठी जास्त हॅशटॅग वापरण्याचा पर्याय नसेल.

अशी माहिती समोर आली आहे की, ही मर्यादा आयफोनवरील क्रिएटर अकाउंटवरील पोस्टवर लागू होणार आहे. आयफोन किंवा अँड्रॉइड फोनवर वैयक्तिक अकाउंट किती हॅशटॅग वापरू शकतो यावर सध्या कोणतीही मर्यादा नाही. मात्र क्रिएटर्सच्या अकाऊंटवर कंपनीच्या निर्णायाचा परिणाम होणार आहे.या लिमिटेशनची टेस्टिंग भारतासह जगभरातील इतर देशांमध्ये केली जात आहे. X वरील अनेक यूजर्सने असेही लिहिले आहे की ते त्यांच्या पोस्टमध्ये तीनपेक्षा जास्त हॅशटॅग वापरू शकत नाहीत. एका यूजरने तर पाच हॅशटॅगची मर्यादा देखील सांगितली. इंस्टाग्रामवरील अनेक यूजर्सनी या अपडेटबद्दल निराशा व्यक्त केली आहे, परंतु अद्याप इन्स्टाग्रामकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे या निर्णयाबाबत अद्याप बराच संभ्रम आहे. कंपनीन अधिकृतपणे घोषणा केल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा महामारी येणार! नव्या भविष्यवाणीने जग हादरले

वहिणीने मध्यरात्री दीराला बंद खोलीत बोलावले, नंतर त्याचा प्राइवेट पार्ट…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *