भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्तपणे पुढील वर्षी टी20 वर्ल्ड कप 2026 खेळवला जाणार आहे. यात अमेरिकेचा क्रिकेट संघ देखील सहभागी असेल. मागील काही दिवसांपासून अमेरिकेच्या क्रिकेट (cricketer)संघात सर्व आलबेल सुरु नाही. दरम्यान खेळाडू अखिलेश रेड्डीला आयसीसीने सस्पेंड केलं आहे. 25 वर्षीय ऑफ स्पिनरवर आयसीसीने तात्काळ खेळण्यास बंदी घातली आहे.

आयसीसीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या वतीने, अमेरिकन क्रिकेटपटू अखिलेश रेड्डी यांच्यावर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचे तीन उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. हे आरोप संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या अबू धाबी T10 2025 स्पर्धेशी संबंधित आहेत. या स्पर्धेसाठी नियुक्त भ्रष्टाचार विरोधी अधिकारी या नात्याने, आयसीसीने अमिराती क्रिकेट बोर्डाच्या वतीने हे आरोप केले आहेत’.

कलम 2.1.1 : अबू धाबी T10 2025 मध्ये सामन्यांचा निकाल, प्रगती, वर्तन किंवा इतर कोणत्याही पैलूमध्ये सुधारणा करण्याचा, हाताळण्याचा किंवा अन्याय्यपणे प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे. किंवा कोणत्याही कराराचा भाग असणे किंवा अयोग्यरित्या प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे.

कलम 2.1.4 : अबू धाबी टी10 2025 मध्ये एक किंवा अधिक सामन्यांदरम्यान दुसऱ्या खेळाडूला कलम 2.1.1 चे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करणे, भडकावणे, प्रोत्साहन देणे, सूचना देणे, मन वळवणे, प्रोत्साहन देणे किंवा जाणूनबुजून मदत करणे (किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे).

आयसीसीने पुढे आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, ‘अखिलेश रेड्डीला(cricketer) लगेचच सर्व क्रिकेट फॉरमॅटमधून काही काळासाठी सस्पेंड केलं जातं आहे आणि आरोपांवर उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे 21 नोव्हेंबर 2025 पासून 14 दिवसांचा वेळ आहे. शिस्तपालन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आयसीसी पुढील भाष्य करणार नाही’.25 वर्षीय अखिलेश रेड्डीने अमेरिका क्रिकेट संघासाठी 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. मात्र त्यात तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. अखिलेशने चार टी 20 सामन्यांमध्ये फक्त एकच विकेट घेतली आहे.

हेही वाचा :

मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन…

महायुतीमध्ये संघर्षाला सुरुवात, पहिल्यांदाच एकनाथ शिंदे भाजपवर कडाडले

लावणी करताना श्रद्धा कपूरला झाली दुखापत, शूटिंग थांबलं, सेटवर नेमकं काय घडलं?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *