जालन्यातील सभेत अजित पवार पोलीस आणि कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. परतूर येथे अजित पवारांची सभा होती. या सभेत व्यासपीठावरील पाठीमागच्या रांगेत बसलेले निवडणुकीतील उमेदवार उपस्थित लोकांना दिसत नसल्याने अजित पवारांनी व्यासपीठाच्या खाली पुढे कार्यकर्त्याना खुर्च्या टाकायला सांगितल्या. आणि व्यासपीठापुढे खुर्च्या टाकून उमेदवारांना खुर्च्यांवर बसायला सांगितलं. आधी पोलीस या ठिकाणी खुर्च्या टाकायला परवानगी देत नव्हते. त्यामुळे अजित पवार पोलिसांवर संतापले(angry). मी तुम्हाला सांगतो असं म्हणत त्यांनी निवडणुकीतील उमेदवारांना व्यासपीठाच्या पुढे बसायला सांगितले.

“मला पोलिसांना सांगायचं आहे की, माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या खूर्च्या येथे लावा आणि त्यांना येथे बसवा. मी सांगतो, चला खूर्च्या काढा. कुठे आहेत कार्यकर्ते? अरे काढ ना ते…खुर्च्या द्या ना एक एक…कळत नाही का? उमेवारांना येथे बसवा. इकडं लावा खूर्च्या…सर्व उमेदवारांनी येथे पुढे या. तुला कळत नाही का….खूर्च्या घ्या पटपट. उमेदवारांची याद कुठे आहे?”, असं अजित पवारांना मंचावरुन खडसावलं(angry). बारामतीमधील माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवर्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलता अजित पवार यांनी स्थानिकांना थेट धमकीच दिल्याचं पाहायला मिळालं आहे. अजित पवारांनी आपल्याच उमेदवारांना निवडून आणावं असं आवाहन करताना असं झालं तर निधीमध्ये कपात होईल असं म्हटलं आहे.
“माळेगावमध्ये आम्ही काही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. पण बारामतीमध्ये 41 पैकी आठ जागा बिनविरोध करण्यास आम्ही यशस्वी ठरलो. आणखी थोडा रेटा लावला असता तर दहाच्या पुढे गेलो असतो. निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांना विरोधात आरोप प्रत्यारोप केले आहेत त्यामुळे आज मी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. माळेगावकरांना माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही मला 35 वर्ष खासदार पदापासून आतापर्यंत संधी दिली. मी कुठल्या पक्षाचा आहे हे बघण्यापेक्षा मी बारामतीचा उमेदवार म्हणून अनेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मला मतदान केलं. मी आयुष्यात विसरू शकत नाही,” असं अजित पवार म्हणाले.
“आजपर्यंत तुम्ही माळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बघितली ती कुठल्याही तज्ञाला कधीच कळणार नाही अशा प्रकारची निवडणूक व्हायची त्यातून पुढे पाच वर्ष काय घडायचं आपण बघितलं. तुम्ही मतदारांनी एक डोक्यातून काढून टाका ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही नगरपंचायतीची निवडणूक आहे. आता आपल्याला वेगळा अर्थाने विचार करावा लागेल. बारामती तुम्ही मला संधी दिल्यानंतर मी 35 वर्षांपूर्वी पुढची पन्नास वर्षे डोळ्यासमोर ठेवून काम केलं. तेव्हा ते काम उभे राहिले आहे. अजूनही बरंच काम करायचं आहे. काही कामे पाईपलाइनमध्ये आहेत. निधी देणार आहे. सर्व काही करणार आहे, पण एका झटक्यात कुठली काम होत नाहीत. त्याला व्हिजन लागतं सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य करावे लागतं. मतभेद बाजूला ठेवावे लागतात,” असंही अजित पवार भाषणात म्हणाले.

हेही वाचा :
मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा महामारी येणार! नव्या भविष्यवाणीने जग हादरले
वहिणीने मध्यरात्री दीराला बंद खोलीत बोलावले, नंतर त्याचा प्राइवेट पार्ट…