नोव्हेंबरचा शेवट जवळ येत असल्याने सकाळ-संध्याकाळची थंडी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मात्र यंदा हवामानात अचानक बदल होताना दिसत असून तापमानात किरकोळ वाढ आणि काही भागांत ढगाळ हवामानाची(weather) नोंद होऊ शकते. गेल्या काही दिवसांत कोकणातील अनेक शहरांत रात्रीच्या वेळी तापमानामध्ये घट झाली होती, परंतु आज मुंबईसह आसपासच्या भागांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

हवामान (weather)बदलामुळे सकाळच्या गारव्याचा अनुभव काहीसा सौम्य होणार असून दुपारपर्यंत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर पडताना छत्री जवळ ठेवणं हितावह ठरेल, असा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात अधूनमधून रिमझिम किंवा मध्यम पाऊस पडू शकतो. आज मुंबईत कमाल तापमान 30–31°C तर किमान तापमान 22–23°C दरम्यान राहणार आहे.
पावसामुळे रस्ते ओले आणि घसरट होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत दृश्यमानतेत घट होण्याची शक्यता देखील व्यक्त केली गेली आहे.रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज सकाळच्या वेळी थंडावा जाणवेल. मात्र पुढील काही तासांत ढगाळ वातावरण वाढणार असून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्गमध्ये तुलनेने अधिक रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांत आज किमान तापमान 20–22°C तर कमाल 30–32°C दरम्यान राहणार आहे.
मुंबई आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असली तरी पालघरमध्ये हवामान कायम स्थिर राहण्याचा अंदाज आहे. पाऊस नसल्याने सकाळ-संध्याकाळचा थंडावा पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. आज पालघरमध्ये किमान तापमान 18°C आणि कमाल तापमान 29°C राहील.एकूणच, आज मुंबई आणि कोकणातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवसांतही हवामान बदलत राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा :
कोल्हापुरात विवाहितेच्या आत्महत्येनं खळबळ! सासऱ्यानं निवडणुकीसाठी… माहेरच्यांचे गंभीर आरोप
स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका…
आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो