महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण (Bahin)योजनेचा’ लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर अनेक महिलांना त्यात विलंब होत असल्याने चिंता वाढली होती. मात्र, सरकारने ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवल्याने लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्याचे 24 दिवस उलटूनही महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नव्हता, यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हा निधी थांबणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, आचारसंहितेचा योजनेच्या हप्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
यामुळे महिलांच्या काळजाला दिलासा मिळाला असून, आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे — जर नोव्हेंबरचा हप्ता उशिरा जमा झाला, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकूण 3000 रुपये पुढील महिन्यात एकत्र जमा होऊ शकतात. त्यामुळे लाभार्थी महिलांना एकप्रकारे ‘डबल गिफ्ट’ मिळण्याची शक्यता आहे.
तथापि, ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांना पुढील काळात हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे योजनेचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी पात्र महिलांनी निर्धारित मुदतीमध्ये ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणींची’ प्रतीक्षा आता लवकरच संपून त्यांच्या (Bahin)खात्यात निधी जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा :
काँग्रेस-शिवसेना शिंदे गटाने मिळून शरद पवारांना दिला झटका
लग्नात मनसोक्त नाचली अन् संधी भेटताच वराला सोडून भरमंडपातून गायब झाली नवरी; Video Viral
ICC ने ‘या’ क्रिकेटरला अचानक केलं सस्पेंड, कोणत्या गोष्टीसाठी मिळाली शिक्षा