भारतीय महिला क्रिकेटची (cricket)स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज, रविवारी (२३ नोव्हेंबर) सांगलीतील समडोळी येथील फार्महाऊसवर होणारा भव्य विवाह सोहळा अंतिम क्षणी स्थगित करण्यात आला आहे. विवाहातील मुख्य विधी सुरू होण्याच्या अगोदरच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने सर्वांच्या आनंदावर विरजण पडले असून, लग्नस्थळी एकदम चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहसोहळ्याच्या तयारीदरम्यान रविवारी सकाळी श्रीनिवास मानधनांची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीला अस्वस्थता जाणवली असली, तरी काही मिनिटांतच प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ताबडतोब उपचार सुरू केले.उपचार करणारे डॉ. नमन शहा यांनी माहिती देताना सांगितले की, “सध्या श्रीनिवास मानधना यांची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार तणाव आणि तब्येतीशी संबंधित कारणांमुळे हृदयविकाराचा झटका आला असावा. पुढील २४ ते ४८ तास ते वैद्यकीय देखरेखीखाली राहणार आहेत.” तसेच गरज पडल्यास अँजिओग्राफी करण्यात येऊ शकते, असेही ते म्हणाले.

वडिलांची प्रकृती लक्षात घेऊन स्मृती मानधनाने भावनिक निर्णय घेतला असून, वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. त्यामुळे आज संध्याकाळी ठरलेला ४.३० चा मुहूर्त तसेच पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.दरम्यान, विवाहस्थळी सजावट काढण्याचे काम सुरू झाले असून, पाहुण्यांनी परतण्यास सुरुवात केली आहे. क्रिकेट(cricket) आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार होते.या घटनानंतर क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांकडून श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना व्यक्त होत आहेत. स्मृती आणि पलाश यांचा विवाह नेमका कधी होणार याबाबत अद्याप नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो

लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट, काय आहे गुड न्यूज ?

काँग्रेस-शिवसेना शिंदे गटाने मिळून शरद पवारांना दिला झटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *