आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या (gold)दरात झालेल्या जोरदार वाढीचा थेट परिणाम कोल्हापूर सराफ बाजारातही दिसून आला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठी उसळी नोंदवली गेली. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी ₹1,27,100 वरून वाढून ₹1,28,600 झाला आहे. म्हणजेच केवळ 24 तासांत सोन्याने तब्बल ₹1,500 ची उडी मारली. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही ₹2,400 प्रतिकिलो इतकी वाढ होऊन चांदीचा दर ₹1,60,900 वर पोहोचला आहे.

या तेजीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाचे घटक कारणीभूत आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची वाढलेली शक्यता, जागतिक भू-राजकीय तणाव आणि अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांकडून(gold) सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल या सर्वांचा थेट परिणाम सोने–चांदीच्या किमतींवर होत आहे.
जागतिक परिस्थिती अस्थिर असताना मौल्यवान धातू हा पारंपरिक सुरक्षित आश्रय मानला जात असल्याने मागणी वाढली असून, त्याच परिणामस्वरूप बाजारातील दरही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

हेही वाचा :
राज्यातील ‘इतक्या’ मराठी शाळा बंद होणार…
आजपासून या राशींचा भाग्योदय!
तुमच्या लिव्हरसाठी ‘हे’ 3 प्येय फायदेशीर, जाणून घ्या