राज्यात महिलांवर(Woman) होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतात ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असतो. यादरम्यान पुण्यात एका पुरुषावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणावर अत्याचार करणारी या महिलेने आपण वकील असल्याची बतावणी केली होती. तिने तरुणावर अत्याचार केल्यानंतर त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. तिने तरुणाचे अश्लील फोटो काढत त्याच्या आधारे पैशांची मागणीही केली. गौरी वांजळे असं या महिलेचं नाव आहे.

पीडित तरुण कोल्हापूरचा आहे. आरोपी महिलेने गुंगीच औषध देऊन तरुणावर लैंगिक अत्याचार केला. महिला (Woman)पुण्यातील रहिवासी असून आपल्या घरीही तिने त्याच्यावर बळजबरी केली. इतकंच नाही तर कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरीदेखील प्रयत्न करण्यात आला होता. तिने तुरणाला बळजबरीने काशी विश्वनाथला नेऊन अत्याचार केले होते.

पुरुषावर अत्याचार करताना अश्लील फोटो तिने कॅमेऱ्यात कैद केले. नंतर याच फोटोंच्या आधारे तिने पैसे मागण्यास सुरुवात केली होती. पैसे दिले नाही तर खोट्या केसमध्ये अडकवेन अशी धमकीही तिने दिली होती. पीडित तरुणाने याप्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत तपास केला जात आहे.

हेही वाचा :

RBI डिसेंबर MPC मध्ये घेणार मोठा निर्णय! घरकर्जसह इतर कर्जाचे EMI कमी होण्याची शक्यता

पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याची जाहीर प्रतिक्रिया

डि.के.ए.एस.सी काॅलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *