पुणे शहरातील एका महिलेने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील(drama) व्यक्तीवर जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. इतकंच नव्हे, तर त्याचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने खंडणी मागितल्याचाही आरोप केला जात आहे. या प्रकरणी चंदगड येथील ४७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पुण्यातील कोथरुड पोलिस ठाण्यात संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तक्रारदार गृहस्थ आपल्या कुटुंबासह तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी पुण्यातील या महिलेशी त्यांची ओळख झाली होती.

त्यानंतर आरोपी महिलेने तक्रारदाराच्या घरी येणे-जाणे सुरू केले आणि त्याला भाऊ मानल्याचा खोटा दिखावा करून आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न केला.(drama) आरोपी महिलेने तीन मार्च ते २५ नोव्हेंबर २०२५ या काळात तक्रारदाराला पाण्यातून काहीतरी मिसळून पिण्यास दिले आणि त्याच्यावर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. यापुढे तिने तक्रारदाराला काशी विश्वनाथला नेऊन तेथेही शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला; तेथे अश्लील फोटो काढले, असे तक्रारीत नमूद आहे.

हे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन (drama) महिलेने त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप आहे. पुण्यात परत आल्यावर एका सराफी दुकानात नेऊन सोन्याची अंगठी खरेदी करून देण्याची मागणी तिने केली; तसेच दोन लाख रुपये खंडणी दे; अन्यथा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.या प्रकरणी कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा :
शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी…
एका तासाचे किती घेशील?, नॅशनल क्रश अभिनेत्रीला अश्लील मेसेज
महिलेकडून पुरुषावर लैंगिक अत्याचार, गुंगीचं औषध दिलं अन् नंतर….