श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित दत्ताजीराव कदम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे (College)प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागाच्यावतीने सदर कार्यक्रम घेण्यात आला.”दि 26 नोव्हेंबर * ” 🇮🇳 *भारतीय संविधान दिनानिमित्त 🇮🇳 भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक रित्या वाचन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाची प्रत व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयातील(College) सकाळ व दुपार सत्रातील प्रभारी प्राचार्य प्रा. व्ही. पी पाटील व प्रा.डी. ए. यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत डॉ मोहन कांबळे यांनी केले तर भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.विशाल कांबळे यांनी केले.
या सामुहिक वाचनाप्रसंगी महाविद्यालयातील डॉ सुभाष जाधव, डाॅ.प्रभा पाटील, डॉ अशोक बोगुलवार, डाॅ. सुनील भोसले,डाॅ.अरुण कटकोळे डाॅ.दिगंबर नागर्थवार, इत्यादीसह सर्व प्राध्यापक कार्यालयीन प्रबंधक श्री.रघुनाथ जोग,अधीक्षक श्री. प्रकाश कुराडे ईत्यादीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभागातील डॉ मोहन कांबळे व डॉ मीनाक्षी मिणचे यांनी केले.

हेही वाचा :
6 मिनिटे जग भरदिवसा बुडणार अंधारात, 100 वर्षात पहिल्यांदाच चमत्कार, तापमानही झपाट्याने..
शिंकताना आपले डोळे आपोआप का बंद होतात…
प्लास्टिकच्या पिशवीपासून बनवला शॉवर अन् चिमुकल्याचा जल्लोष पाहून इंटरनेटही झालं भावूक, पहा VIDEO