कोल्हापुरात जादूटोणा आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे.(wedding)अशातच कात्यायनी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका चिमुकलीला उसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलीनं आरडाओरड केल्यानं मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे.

कोल्हापुरातील कात्यायनी ते गिरगाव दरम्यान रस्त्यावरील उसाच्या शेतात हे भयंकर प्रकरण उघडकीस आलं.(wedding) विकास कांबळे वय वर्ष २८असे नराधमाचे नाव आहे.घटनेच्या दिवशी चिमुकली आईसोबत नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती. लग्नात नराधमाची नजर चिमुरडीवर पडली. त्यानं तिला कात्यायनी ते गिरगाव दरम्यान रस्त्यावरील उसाच्या शेतात नेलं. तसेच तिथं चिमुकलीवर जबरदस्ती केली. अत्याचाराचा प्रयत्न करत असताना चिमुकलीनं त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आरोपीनं तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. (wedding)याच दरम्यान, चिमुरडी जोरजोरात ओरडली. मुलीनं आरडाओरड केल्यानं मोठा अनर्थ टळला. स्थानिकांनी तातडीने उसाच्या दिशेनं धाव घेतली. तसेच चिमुकलीची नराधमाच्या तावडीतून सुटका केली. या घटनेनंतर इस्पुरली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी विकास कांबळेला ताब्यात घेतलं.या घटनेनंतर चिमुकली प्रचंड घाबरली. चिमुकलीच्या आईनंही आरोपीविरोधात संताप व्यक्त केला. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा :
स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय?
राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!
क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार