स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे.(announcement)लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणानंतर देशाला संबोधित करताना त्यांनी ‘प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना 15,000 रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मोदींनी सांगितले की, या योजनेसाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पुढील दोन वर्षांत 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना विशेषतः उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार असून, तरुणांना रोजगाराच्या संधी वाढवण्यास मदत करेल.

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत. खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या उमेदवाराला त्या कंपनीत किमान सहा महिने सातत्याने काम करावे लागेल. त्याचबरोबर ती कंपनी EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.(announcement) या अटी पूर्ण झाल्यानंतरच 15,000 रुपयांची प्रोत्साहनरक्कम देण्यात येईल. मोदींनी स्पष्ट केले की, रोजगार मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी ही रक्कम थेट उमेदवाराच्या बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे मध्यस्थ किंवा कागदपत्रांच्या विलंबाचा प्रश्न राहणार नाही.

या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नोकरी मिळाल्यानंतर तुमचे पीएफ खाते सुरू झाल्यावर तुम्ही आपोआप या योजनेसाठी पात्र ठरता. (announcement)सरकारकडून पात्र उमेदवारांची माहिती थेट EPFO मार्फत घेतली जाईल आणि त्यानंतर रक्कम वितरित केली जाईल. ही योजना तरुणांना नोकरीच्या प्रारंभी आर्थिक आधार देण्यासोबतच रोजगार निर्मितीला चालना देईल. उत्पादन क्षेत्रावर भर देऊन रोजगार वाढवण्याची सरकारची ही योजना ‘नवा भारत’ या स्वप्नाशी जोडली गेली आहे, असे मोदींनी भाषणात सांगितले.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल