महाराष्ट्रातील लाखो वाहनधारकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे.(HSRP)हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. मोठ्या संख्येने वाहनधारकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने सरकारने पाचव्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्यात अजूनही 65 टक्क्यांहून अधिक वाहने HSRP शिवाय रस्त्यावर दिसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवी तारीख जाहीर करत वाहनधारकांना तातडीने प्लेट बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 अशी ठेवण्यात आली आहे. ही पाचवी मुदतवाढ ठरली आहे.

पुण्यासारख्या शहरांमध्ये परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे. (HSRP)शहरातील 25 लाखांहून अधिक वाहनांपैकी सुमारे 15 लाखांवर HSRP बसवणे अजून बाकी आहे. त्यामुळे वेगाने प्रक्रिया पूर्ण करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर HSRP अनिवार्य करण्यात आली आहे. जानेवारीपासून ही प्रक्रिया राज्यभर सुरू आहे. अपघात, चोरी किंवा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या वाहनांची ओळख जलद पटावी यासाठी HSRP लावणे अत्यावश्यक ठरते. या प्लेटमध्ये विशेष कोड आणि सुरक्षितता तंत्रज्ञान असल्याने वाहन शोधणे आणि ट्रॅक करणे सुलभ होते.

पुण्यात आतापर्यंत 7.5 लाख वाहनांवर HSRP बसवण्यात आली आहेत, (HSRP)तर सुमारे 10.5 लाख वाहनांनी नोंदणी पूर्ण केली आहे. मात्र अजूनही अंदाजे 1.5 लाख वाहनांवर प्लेट बसवणे बाकी आहे. वाढलेल्या मुदतीचा फायदा घेऊन बाकी राहिलेल्या वाहनधारकांनी प्रक्रिया पूर्ण करावी, असा इशारा विभागाने दिला आहे.वाहतूक विभागाने अनेक वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही मोठ्या संख्येने वाहनधारक ही प्रक्रिया पुढे ढकलत आहेत. पुण्यात सध्या सुमारे 65% वाहने HSRP शिवाय असल्याचे अधिकृत अहवाल सांगतात.

त्यामुळे आता सरकारने अधिक कडक भूमिका घेतली आहे. (HSRP)सध्या HSRP नसलेल्या वाहनांचे आरटीओमधील कामकाजही तात्पुरते थांबवण्यात आले आहे. 31 डिसेंबरनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंड आकारण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना कोणतीही अडचण किंवा दंड टाळायचा असल्यास ताबडतोब नोंदणी करून प्लेट बसवण्याचा सल्ला वाहतूक विभागाने दिला आहे. राज्यातील 2.10 कोटी वाहनांपैकी फक्त 73 लाख वाहनांवर सध्या HSRP बसवण्यात आल्या आहेत, त्यामुळे उर्वरित वाहनधारकांनी घाई करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

इतके स्वस्त कुठेच नाही, Jio चे 3 स्वस्त प्लॅन्स, JioHotstar फ्री बघा,

युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्याबाई सुप्रिया सुळेंचा जोरदार डान्स अन्

शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ ४ दिवशी सर्व

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *