हिवाळ्याची थंडी सुरू झाली की सर्वात पहिला त्रास जाणवतो तो त्वचेचा. (winter)कोरडी, खरखरीत आणि ओलावा हरवलेली त्वचा अनेकांना त्रासदायक ठरते. थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. हे टाळण्यासाठी अनेकजण मॉइश्चरायझर किंवा क्रीमचा वापर करतात; परंतु हा तात्पुरता उपाय आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी बाहेरील उपचारांसोबतच आहारातूनही त्वचेला पोषण देणं तितकंच गरजेचं आहे.

योग्य अन्न सेवन केल्यास त्वचा आतून मजबूत होत जाते आणि तिचा पोत अधिक मऊ, (winter)लवचिक आणि चमकदार राहतो. काही फळं व भाज्यांमध्ये असे पोषक घटक असतात जे त्वचेची दुरुस्ती करण्यात मदत करतात. हिवाळ्यातील कोरडी हवा, कमी आर्द्रता, गरम पाण्याने आंघोळ यांसारखे घटक त्वचेचा नैसर्गिक तेलकट थर कमी करतात आणि त्यामुळे त्वचा अधिक कोरडी पडते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यामागे गरम पाणी व कडक साबण यांचाही मोठा वाटा असतो.(winter) गरम पाण्याने जास्त वेळ आंघोळ केल्यास त्वचेतील आवश्यक तेलं नाहीशी होतात, त्वचेचा थर पातळ होतो आणि खाज, लालसरपणा किंवा खडबडीतपणा निर्माण होतो. या समस्यांचा सामना करण्यासाठी आहारात काही विशिष्ट जीवनसत्त्वांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.व्हिटॅमिन ए त्वचेच्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करते. यामुळे त्वचा सोलून निघणं कमी होतं आणि कोरडे डाग बरे होण्यास मदत होते. गाजर, पालक आणि केळी यांसारख्या पदार्थांमध्ये हे मुबलक प्रमाणात आढळते.व्हिटॅमिन सी त्वचेचं संरक्षण करण्यास, सुरकुत्या कमी करण्यास आणि रंग उजळण्यास उपयुक्त आहे. संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोली हे कोलेजन तयार करण्यात मदत करणारे महत्त्वाचे स्रोत आहेत.व्हिटॅमिन ई त्वचेला आवश्यक ओलावा देऊन मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. एवोकॅडो, बदाम, सूर्यफुलाच्या बिया आणि ब्रोकोलीमध्ये हे मुबलक प्रमाणात आढळते.

हिवाळ्यातील कोरडेपणा कमी करण्यासाठी(winter) बाहेरील क्रीम किंवा तेलं उपयोगी ठरतात, मात्र त्यासोबत काही जीवनशैलीच्या सवयी पाळल्यास त्वचेचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिल्यास शरीरातील हायड्रेशन टिकून राहते आणि त्वचेलाही ओलावा मिळतो.आहारात बदाम, जवस आणि सूर्यफुलाच्या बिया यांचा समावेश केल्यास त्वचेला आवश्यक फॅटी ॲसिड्स मिळतात. यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या मऊ राहते. पुरेशी झोप घेतल्यास त्वचेला विश्रांती मिळते आणि टवटवीतपणा टिकतो. बाहेरील थंड हवेत जाण्यापूर्वी क्रीम किंवा तेलाचा थर लावल्यास त्वचेचा नैसर्गिक संरक्षण कवच मजबूत राहते.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी
हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास