भारतात बिअर पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेजकण दररोजण बिअरचे सेवन करतात(drink) तर काहीजण पार्ट्यांमध्ये वीकेंडला किंवा रिलॅक्स होण्यासाठी बिअर पितात. बिअर ही दारूपेक्षा थोडी सौम्य असते, म्हणजे यात अल्कोहोलचे प्रमाण खूप कमी असते. असं असलं तरी याचे मर्यादेपेक्षा जास्त सेवन करणे धोकादायक ठरू शकते. कारण बिअर पिल्याने आरोग्यावर आणि शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात बिअर पिणे गरजेचे आहे. आज आपण एका दिवसात किती बिअर प्यावी? बिअरची नशा किती तास राहते अशी प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.महिन्यातून किती वेळा बिअर प्यावी याचे काही ठरलेले प्रमाण नाही. जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही महिन्यातून 2-4 वेळा मर्यादित प्रमाणात बिअर पिऊ शकता.

मात्र यासाठी काही नियमांचे पालन करावे. पुरुषांनी दिवसातून 650 मिली म्हणजे (drink)अंदाजे 2 ग्लास पेक्षा जास्त बिअर पिऊ नये. तर महिलांनी दिवसातून 330 मिली म्हणजे अंदाजे 1 ग्लासापेक्षा जास्त बिअर पिऊ नये. दररोज बिअर पिल्याने वजन वाढू शकते आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो.तुम्ही तुरळक प्रमाणात बिअर पित असाल तर हलक्या आणि कमी कॅलरी असलेली बिअर पिणे फायदेशीर ठरेल. कारण त्यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीराचे कमी प्रमाणात नुकसान होते. कोणत्या ऋतूत बिअर प्यावी? असाही अनेकांना प्रश्न पडतो. बिअर कोणत्याही ऋतूत पिता येते, मात्र उन्हाळ्यात थंड बिअर पिल्यास ताजेतवानेपणा येतो.

एका बिअर पिले की ती नशा 2 ते 4 तासांपर्यंत असते. (drink)मात्र आपण किती प्रमाणात बिअर पिलो? शरीराचे वजन किती आहे? बिअर रिकाम्या पोटी घेतली की अन्नासोबत? यावर बिअरची नशी किती तास टिकते हे अवलंबून आहे. महिलांनी गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करताना बअरचे सेवन करू नये. तसेच तुम्हाला यकृत, मूत्रपिंड किंवा हृदयरोग असेल तरीही बिअर पिऊ नये. रिकाम्या पोटी किंवा तुम्ही औषधे घेत असाल तरीही बिअरचे सेवन करू नये. तसेच वाहन किंवा एखादे यंत्र चालवण्यापूर्वी बिअरचे सेवन करू नये.
हेही वाचा :
स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय?
राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!
क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार