भारतीय कार्पोरेट जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.(corporate) गेल्या ५ वर्षांत देशातील २ लाखांपेक्षा जास्त प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या. ही आकडेवारी फक्त मार्केटमधील चढ-उतार दर्शवत नाही तर शेल कंपन्या किंवा निष्क्रिय संस्थांवरील सरकारच्या कारवाईकडे देखील निर्देश करते. सोमवारी संसंदेत हा मुद्दा खूप चर्चेत राहिला. सरकारने लोकसभेत गेल्या ५ वर्षांत किती कंपन्या बंद झाल्या याची धक्कादायक आकडेवारी जारी केली होती.

सरकारने लोकसभेमध्ये सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात (corporate)भारतात एकूण १५,२१६ प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या. २०२१-२२ मध्ये ६४,०५४ प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या. २०२२-२३ मध्ये सर्वाधिक ८३,४५२ खासगी कंपन्या बंद पडल्या. त्यानंतर २०२३-२४ मध्ये एकूण २१,१८१ कंपन्या बंद पडल्या. तर २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशभरात एकूण २०,३६५ कंपन्या बंद पडल्या. या सर्व आकडेवारीनुसार २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत म्हणजे या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण २,०४,२६८ प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या आहेत.

राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा ​​यांनी लोकसभेमध्ये सांगितले होते की,(corporate)कंपनी कायदा २०१३ अंतर्गत गेल्या पाच वर्षांत एकूण २०४,२६८ प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या आहेत. या कंपन्या विलीनीकरण आणि रूपांतरण यासारख्या कारणांमुळे बंद पडल्या. याशिवाय, काही कंपन्या व्यवसाय करण्यास तयार नसल्यामुळे बंद पडल्या आहेत. तर काही कंपन्या दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्यामुळे बंद पडल्या.

२०२१-२२ पासून सुरू होणाऱ्या ५ आर्थिक वर्षांत कॉर्पोरेट व्यवहार(corporate) मंत्रालयाने १,८५,३५० कंपन्यांना अधिकृत नोंदींमधून काढून टाकले आहे. चालू आर्थिक वर्षात १६ जुलै २०२५ पर्यंत ८,६४८ कंपन्यांनाही नोंदींमधून काढून टाकण्यात आले आहे. जर कंपन्यांनी दीर्घकाळ कामकाज थांबवले असेल किंवा नियामक आवश्यकता पूर्ण केल्यानंतर स्वेच्छेने माघार घ्यायची असेल तर त्यांना रेकॉर्डमधून काढून टाकता येते. ज्या कंपन्यांना गेल्या ५ वर्षांत बंद पडल्या त्यामधील अनेक कंपन्या या विलीनीकरण, रूपांतरण, स्वच्छेने बंद होणे आणि नियमांनुसार निष्क्रियतेच्या कालावधीमुळे रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले.

२०२४-२५ – २०,३६५ कंपन्या
२०२३-२४ – २१,१८१ कंपन्या
२०२२-२३ – ८३,४५२ कंपन्या
२०२१-२२ – ६४,०५४ कंपन्या
२०२०-२१ – १५,२१६ कंप

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू

केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी

हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *