इचलकरंजी नजीकच्या खोतवाडीमध्ये आज एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील घटना समोर आली आहे.प्राथमिक माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा आरोप एका वयोवृद्ध व्यक्तीवर करण्यात आला आहे. ही बाब लक्षात येताच परिसरातील काही महिलांनी त्या व्यक्तीला जाब विचारत त्याला चोप दिल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मात्र, माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. संबंधित वयोवृद्ध व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे.अल्पवयीन मुलीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येत असून, तिच्या सुरक्षेला आणि समुपदेशनाला प्राधान्य देण्यात येत आहे.

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, दोष आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी
हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास