पाणीपुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी का दिली नाही, या कारणावरून(seller)तिघांनी मिळून पाणीपुरी विक्रेत्याला दगडाने मारहाण केली. तसेच त्याच्या घराची तोडफोड केली. याप्रकरणी पवन सुरेश गवळी, प्रेम सचिन सरवंडे आणि गौरव अमोल साबळे या तिघांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नरेश रामप्रकाश वर्मा वय ३०, रा. विक्रमनगर यांनी तक्रार दिली.(seller) ही घटना रविवारी ता.७ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वर्धमान चौक येथे घडली. वर्मा हे पाणीपुरी विक्री करत असताना संशयित तिघांनी वाद घालत दगडाने त्यांच्या डाव्या हातावर मारहाण केली. त्यानंतर तिघांनी वर्मा यांच्या विक्रमनगर येथील घरासमोर जाऊन दरवाजाचे नुकसान करत शिवीगाळ केली.

दरम्यान, जीव वाचवण्यासाठी वर्मा पळत जाऊन बालाजी चौकातील (seller)एका चिकन सेंटरजवळील देवेंद्र राजपूत यांच्या घरात जाऊन लपले. मात्र; संशयित आरोपी तिथेही पोहोचले. त्यांनी पुन्हा शिवीगाळ करत तेथे असणाऱ्या समीर सय्यद याला हाताने मारहाण केली आणि त्यांची पत्नी फातीमा सय्यद हिला दगड फेकून जखमी केले. त्यानंतर तिघे पळून गेले. या सर्व प्रकारानंतर वर्मा यांनी आज सकाळी गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा :
झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा
‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशारा