महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने (removed)श्री शिवतीर्थ ते छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी राबविण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत काही दुकानदारांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. यावेळी एक दुकानदार त्याचा रस्त्यावरील फलक काढल्याच्या कारणावरुन थेट वाहनाच्या खालीच झोपल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या मोहिमेत वाहतुकीला अडथळा ठरणारे ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले.शहरात सातत्याने अतिक्रमण वाढत असून त्याबाबत तक्रारीही प्राप्त होत आहेत.

त्याची दखल घेत आयुक्त पल्लवी पाटील यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत.(removed)त्यानुसार महापालिकेच्या व विभागाने शुक्रवारी सहाय्यक आयुक्त धनंजय पळसुले यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विरोधात मोहिम राबवली. श्री शिवतीर्थ ते छत्रपती शाहू पुतळा या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटवताना अनेक वर्षे रस्त्याकडेला ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. तर काही हातगाडे, स्टॅण्डबोर्ड जप्त केले.

काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचेही (removed)स्पष्ट झाल्याने संबंधितांना ते त्वरीत काढण्याचे आदेश दिले आहेत.या कारवाईत अतिक्रमण विभागप्रमुख सुभाष आवळे, क्रीडाधिकारी संजय शेटे, विजय जगताप यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान वारंवार अतिक्रमणाविरोधात मोहिम राबवुनही अतिक्रमण पुन्हा पुन्हा होत असलेने प्रशासनाने कायमस्वरुपी अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे.या मोहिमेत काही दुकानदारांनी विरोध दर्शवत अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी हुज्जत घातली. पण त्याला न जुमानता मोहिम सुरुच होती. एका दुकानदाराने दुकानाचा डिजिटल फलक जप्त करण्यास विरोध करत वाद घातला. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाशी झटापट झाली. त्यातूनच ती दुकानदार थेट वाहनाच्या दोन्ही चाकांच्यामध्ये आडवा पडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर त्याची समजूत काढत व समज देत तेथून हटविण्यात आले.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू
केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी
हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास