इचलकरंजी शहर व आसपासच्या भागात वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी आणि(demands) गुन्हेगारांवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी एलसीबी स्थानिक गुन्हे अन्वेषण चे स्वतंत्र कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली. सभागृहात औचित्याच्या मुद्यावर बोलताना त्यांनी शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष वेधले.आमदार आवाडे म्हणाले की, इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते आणि कोल्हापूरनंतर जिल्ह्यातील हे महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे.

उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने शहरात अनेक(demands) कुटुंबांचे स्थलांतर झाले असून, शहराचा औद्योगिक विस्तार वाढत असताना अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी देखील वाढत चालली आहे.शहरात सध्या खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, हाणामारी यांसारखे गुन्हे सतत घडत आहेत. आधी इचलकरंजीत एलसीबीचे स्वतंत्र कार्यालय कार्यरत होते ज्याद्वारे अनेक गुन्हे उकलले जात असत आणि गुन्हेगारीवर आळा बसत होता. मात्र काही वर्षांपूर्वी हे कार्यालय बंद करण्यात आले.

आमदार आवाडे यांनी सांगितले की, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर(demands) एलसीबी कार्यालय पुन्हा सुरू केल्यास सराईत गुन्हेगारांवर आणि अवैध धंद्यांवर कडक नजर ठेवणे शक्य होईल, तसेच प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळेल. त्यामुळे शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता, इचलकरंजीत एलसीबीचे स्वतंत्र कार्यालय लवकरात लवकर पुन्हा सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा :
“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक
जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची
मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता