रांगोळी ता. हातकणंगले येथील काळम्मावाडी वसाहत परिसरात घडलेल्या (Murder)शुभम सादळे वय २७ खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. दोन दिवसांपासून पसार असलेल्या तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दर्शन महेश कांबळे वय २२, सागर सुनील माने वय ३३ आणि प्रथमेश ऊर्फ पेप्या रवींद्र कांबळे वय २३, तिघे रा. माळभाग, रांगोळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.२९ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शुभम सादळे याच्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला होता.

प्रेमप्रकरणात शुभमने मदत केल्याचा राग मनात धरून तिघांनी त्याच्याशी (Murder)वाद घालून शिवीगाळ केली आणि पोटात वार करून त्याची हत्या केली, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके तयार करण्यात आली होती. कर्नाटकातील बोरगाव, चांदशिरदवाड, चिक्कोडी, शिरगाव, बोंबलवाड, केरूर तसेच हुपरी, कुरुंदवाड आणि हातकणंगले परिसरात एस.टी. स्टँड, लॉज, वर्दळीची ठिकाणे, एटीएम केंद्रे आणि पेट्रोल पंपांवर कसून शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान, पोलिस अंमलदार सागर चौगुले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तिघे आरोपी अतिग्रे फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार शनिवारी सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. (Murder)प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला सागर माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा फायदा घेत कट रचून, पाठलाग करत योग्य संधी साधून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने हा खून पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी तीन दिवस रांगोळी गाव बेमुदत बंद ठेवले होते.

शनिवारी रात्री आरोपी ताब्यात घेतल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला (Murder)आणि गावातील व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले.दरम्यान, रविवारी ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत खूनप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर

पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ

 सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *