कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी(Email)मिळाल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. कार्यालयाला आलेल्या धमकीच्या मेलमध्ये ५ किलो आरडीएक्स ठेवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही माहिती समोर येताच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना हा मेल प्राप्त झाला (Email)असून त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमन दल, बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. संपूर्ण परिसर बंद करून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

अचानक मिळालेल्या धमकीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.(Email)याप्रकरणी पोलिसांकडून मेलचा स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू असून धमकी खरी की खोटी याबाबत तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत.
हेही वाचा :
विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी
३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit