नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आहेत.(leaders) प्रचाराची धामधूम वाढली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यातच कोल्हापुरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचे प्रकार घडू लागले आहेत. कोल्हापुरातील कागल तालुक्यात असणाऱ्या मुरगुड शहरात असाच एक प्रकार समोर आलाय. निवडणुकीला उभ्या असलेल्या एका उमेदवाराच्या घरासमोरच करणी सदृश्य प्रकार करून भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.काल शुक्रवारी पहाटे मुरगुड येथील प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे यांच्या मुख्य बाजार पेठेतील निवासस्थानाच्या दारासमोर हा करणीचा प्रकार करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि छत्रपती शाहू आघाडीचे नेते समरजीत घाटगे यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मोठी प्रचारसभा पार पडली होती. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अमृता मोर्चे यांच्या घराच्या (leaders) दारात पत्रावळीत नारळ, पाच-सहा लिंबू, अंगारा, हळद, कुंकू आणि फुले असं साहित्य ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे लिंबूंना मोठ्या प्रमाणात टाचण्या खुपसलेल्या होत्या, ज्यामुळे हा प्रकार भानामतीचा असल्याचं स्पष्ट झालं. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हे कृत्य रात्रीपासून पहाटेपर्यंत केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मोर्चे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली असून, शहरभर अशा प्रकारांची चर्चा होत आहे.
या घटेनंतर मुरगूड शहरात अशा प्रकारांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहेत.(leaders) मतदानयंत्रे ठेवण्यात येणाऱ्या स्ट्राँग रूमच्या समोरही लिंबू टाचण्या टोचून फेकण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, गावभागातील एका इतर उमेदवाराच्या घराच्या दाराला सात गाठी बांधलेला काळ्या रंगाचा गोफ अडकवण्यात आला होता. या सर्व प्रकारांमुळे निवडणूक वातावरण तापलं असून, लोकशाहीवर हल्ला होत असल्याचा आरोप होत आहे. तर स्थानिक नागरिकांनी या अंधश्रद्धा प्रथांना आळा घालण्याची मागणी केली आहे.या प्रकरणी अमृता मोर्चे यांचे पती गौरव विकास मोर्चे यांनी लोकशाहीची थट्टा करणाऱ्या या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. ‘भीती निर्माण करून राजकारण करणाऱ्यांना तात्काळ शोधून कठोर शिक्षा झालीच पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही या घटनेचा विरोध नोंदवला असून, प्रचार सभा आणि सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे.

मुरगूड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून,(leaders) परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. भानामती करणाऱ्या व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, अन्य ठिकाणी घडलेल्या प्रकारांचाही तपास सुरू आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी शांतता राखण्यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. या घटनेमुळे मुरगूड नगरपरिषद निवडणूक चर्चेत आली असून, 20 जागांसाठी राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना महायुती आणि शाहू आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय?
राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!
क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार