“गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी मध्ये माकडांचा खेळ सुरु आहे.(past) 52 पत्यांचा जोकर हा संजय राऊत यांच्या पक्षात भरला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती महाराष्ट्रला पुढे नेण्याचं कामं करत आहे. तीन पक्षात गोरिला माकडं डान्स करतो आणि माकड एकमेकांना लाथ मारायचं कामं करत आहे, ती हालत आहे” अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली. “खरी सर्कस महाविकास आघाडीच्या तंबूत आहे. महाविकास आघाडीला जनतेले नाकारलय. विरोधी पक्षनेतापद मिळावं इतकही संख्याबळ नाही. विधनासभेला 90 जागांपैकी 20 जागा आल्या. ते दावा करू शकत नाहीत. जनतेने तुम्हाला नाकारलं आहे. त्यामुळे तुम्हाला विरोधपक्षनेते पद दिलं जाऊ शकत नाही” असं नवनाथ बन म्हणाले.

“या आधीच्या प्रथा पायदळी तुडवण्याचं कामं कोणी केलं?(past) आमच्या नेत्यांची घरं, नेत्यांच्या घरी cctv लावण्याच कामं, गिरीश महाजन यांना फसवण्याचं कामं तुमच्या पक्षाने केली. महाराष्ट्र मधल्या प्रथांबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये. विरोधी पक्षनेतापद द्यायचं की नाही हे जनता ठरवते. संजय राऊत यांची लायकी काय आहे? उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पात्रता काय आहे? हे जनतेने दाखवलं आहे” अशा जहरी शब्दात नवनाथ बन यांनी हल्लाबोल केला.

“संजय राऊत यांची खासदारकी संपत आहे. (past)त्यांना माहित आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून जागा मिळणार नाही. केवळ म्हणून ते राहुल गांधी यांची गुलामी करत आहेत. रवींद्र चव्हाण हे RSS चे स्वयंसेवक आहेत. उभ्या हयातीत कधीही शिवसेनेत प्रवेश केला नव्हता” असं नवनाथ बन यांनी सांगितलं.

“ठाकरे बंधू एकत्र आले तरीही त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही. (past)महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकेल. जिथे नवाब मलिक नेतृत्व करत आहेत, तिथे आम्ही युती करत नाही. जो पर्यंत ते निर्दोष सिद्ध होत नाहीत तो पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. जर यावरून आम्हाला राष्ट्रवादीशी युती तोडायला लागली तरीही चालेल. भाजप-शिवसेना आम्ही मुंबई महापालिका निवडणुका एकत्रित लढणार आहोत. येत्या 5-6 दिवसात महायुतीचा फॉर्मुला आम्ही जाहीर करू” असं नवनाथ बन म्हणाले.

हेही वाचा :

दोन दिवस फोनपे-गुगलपे बंद राहणार, या बँकेच्या ग्राहकांना फटका

पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र

अजितदादांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने ..करुणा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *