दिल्लीमध्ये सुरू असलेल्या डिनर डिप्लोमसीच्या पार्श्वभूमीवर (gift)राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची एकत्र येण्याची चर्चा पुन्हा तापली आहे. 12 डिसेंबर हा शरद पवार यांचा वाढदिवस. नेहमीप्रमाणे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मोठा सूरपार्टीचा माहोल, राजकारण, समाजकारण, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती, आणि त्यात सर्वात लक्षवेधी ठरली ती अजित पवारांची एंट्री. यामुळे विभाजनानंतरही दोन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात नव्यानेच चर्चेत आली आहे.जरी पक्षात मोठी फूट पडली असली तरी पवार कुटुंबातील नातेसंबंधात कटुता दिसत नाही. कौटुंबिक कार्यक्रमांत दोन्ही बाजूंचे नेते आणि कार्यकर्ते आवर्जून सहभागी होताना दिसतात. त्यातूनच, राजकीय दूरावा असूनही संबंध जिव्हाळ्याचेच असल्याचे चित्र दिसते.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीत साधारण वीस मिनिटांची बंद दाराआड चर्चा(gift) झाल्याची सूत्रांनी दिल्लीतील राजकीय गल्ल्यांमध्ये चर्चा सुरू आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष पुन्हा जवळ येऊ शकतात का, या मुद्द्यावर संवाद झाला असल्याचे संकेत आहेत. नेमके काय बोलणे झाले याबाबत अधिकृत माहिती नसली तरी ‘राजकीय पुनर्मिलन’ या शक्यतेला वेग आला आहे.राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भूमिका स्पष्टपणे पवार कुटुंब एकत्र यावे, अशीच आहे. त्यांची भावना आहे की दोन गट एकत्र आल्यास संघटना अधिक बळकट होईल आणि राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. काही नेत्यांनी तर आजच्या बैठकीत याबाबत खुली चर्चा होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले आहे.

काही जण मात्र ही भेट केवळ कौटुंबिक आणि औपचारिक असल्याचं म्हणत आहेत. (gift)पवार कुटुंबातील लग्नकार्य किंवा वाढदिवसासारख्या प्रसंगी दोन्ही बाजू एकत्र येतात ही परंपरा कायम राहिली असल्याचे ते स्पष्ट करत आहेत. राजकीय निर्णयाचा अंतिम अधिकार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडेच राहील, असे म्हणत काही खासदारांनी पक्षावरची निष्ठा पुन्हा अधोरेखित केली.दरम्यान, आणखी एक महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा म्हणजे—शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का? संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने देशभरातील अनेक खासदारांनी पवार यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि त्यांना पुन्हा राज्यसभेत पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पवारांसारखा अनुभवी नेता उच्च सदनात असणे हे महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचे असल्याचे मत खासदारांनी नोंदवले. पक्षाचा आकडा किती आहे यापेक्षा सर्वपक्षीय सहकार्य मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

या सर्व घडामोडींमध्ये आणखी एक रंगतदार प्रसंग चर्चेत आला. (gift)राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि गौतम अदानी एका टेबलावर बसून संवाद करत असल्याची माहिती बाहेर आली आणि त्यावर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी चिमटा काढला. राज्यातील प्रश्न सुटत असतील तर असे दृश्य वाईट नाही, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.एकूणच, पवार कुटुंबातील संवाद आणि दिल्लीतील राजकीय वातावरण यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत अधिक गडद होताना दिसत आहेत. पुढील काही दिवसांत अजुन एखादी महत्त्वाची हालचाल दिसू शकते, अशी राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे.

हेही वाचा :

विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी

३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *