बॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी(Drama) अभिनेत्री राखी सावंत हिने ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना थेट आव्हान दिलं आहे. पापाराझींबद्दल काही आक्षेपार्ह बोलल्यास ‘निळ्या ड्रममध्ये’ भरून घेऊन जाण्याची धमकी तिने दिली आहे. जया बच्चन सध्या माध्यमांमध्ये त्यांच्या पापाराझींविरुद्ध केलेल्या टिप्पणीमुळे खूपच चर्चेत आहेत.काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांनी पापाराझींचा उल्लेख ‘घाणेरडी, तंग पॅन्ट घालणारे उंदीर’ असा केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व पापाराझ्झींनी एकत्र येऊन बच्चन कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

जया बच्चन यांच्या या वक्तव्याला मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारांनी पाठिंबा दिला,(Drama)तर अनेकांना त्यांचे बोलणे योग्य वाटले नाही. याच पार्श्वभूमीवर, राखी सावंतने पापाराझींना काहीही बोलल्यास त्या कठोर भूमिका घेतील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.१४ डिसेंबर २०२५ रोजी फरहाना भट्ट यांच्या एका कार्यक्रमात राखी सावंतने खास अंदाजात हजेरी लावली. तिने यावेळी सोबत एक निळा ड्रम आणला होता आणि रेड कार्पेटवर प्रवेश करताना तिने चक्क स्वतःला त्या ड्रममध्ये लपवले होते.

राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. (Drama)त्या व्हिडिओमध्ये ड्रममधून बाहेर येत राखी ओरडते, “जया जी, माझ्या पापाराझ्झींना काहीही बोलू नका. नाहीतर तुम्हाला मी याच ड्रममध्ये टाकून घेऊन जाईन”. दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये राखी म्हणतेय, “मी खास जया बच्चन यांच्यासाठी हा निळा ड्रम घेऊन आले आहे. मी त्यांना या ड्रमवर बसवीन. माझ्या पॅप्सलाबोलण्यापूर्वी, आधी तुम्ही स्वतःचे कपडे व्यवस्थित करा आणि मग माझ्या पॅप्सला उपदेश द्या. मला माझ्या पॅप्सचा अभिमान आहे. लव्ह यू”.या दरम्यान, राखी सावंतने जया बच्चन यांना विनम्रपणे विनंती देखील केली. राखी म्हणाली, “जया बच्चन , तुमचा ‘मिली’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मी तुमच्यावर प्रेम करते, परंतु कृपया माझ्या पापाराझी आणि माध्यमांबद्दल काहीही बोलू नका.”राखी सावंतच्या या धाडसी व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ‘शेवटी कोणीतरी बोललंच’, ‘वाह, माझी धाडसी राखी’, ‘हिच्यातच हिम्मत आहे’, ‘राखी कोणालाही काहीही बोलू शकते’ अशा अनेक कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे.
हेही वाचा :
जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा
‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे
बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचाEditEdit