बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचे “लॉलीपॉप… कँडी शॉप”(trolled) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. मात्र हे गाणे रिलीज होताच वादग्रस्तही ठरले आहे. या गाण्यातील नेहाने केलेल्या एका डान्स स्टेप्सला अश्लील म्हटलं जात आहे. नेटकऱ्यांनी याबद्दल तिच्यावर बरीच टीका केली आहे. लोक तिच्यावर देशाची संस्कृती बिघडवत असल्याचा आरोपही करत आहेत. सोशल मीडियावर तिच्यावर प्रचंड टीका होत आहे.नेहा कक्करचे हे गाणे काही दिवसांपूर्वीच युट्यूबवर रिलीज झाले होते.

तिने तिचा भाऊ टोनी कक्कर सोबत ते संगीतबद्ध केले आहे,(trolled) जो म्युझिक व्हिडिओमध्ये देखील आहे. हे गाणे नेहा आणि टोनी यांनी मिळून गायले आहे. संगीत आणि लिरिक्स टोनीचे आहेत. त्यानेच गाण्याची निर्मितीही केली आहे.या गाण्यात नेहाने केलेल्या एका डान्स स्टेपवर लोकांकडून टीका होत आहे. यासाठी नेहा आणि टोनी दोघेही टीकेला सामोरं जात आहेत. काही जण तर म्हणत आहेत की ती कोरियन लोकांची नक्कल करत आहे. तर काही जण म्हणत आहेत की नेहाला अशा कृतीची लाज वाटली पाहिजे. एका युजरने म्हटले आहे की, “ही नेहा काय करण्याचा प्रयत्न करत आहे?

ती भारतीय संस्कृतीला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे? (trolled) देशातील तरुण तिच्याकडून काय शिकतील?” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “तिची गाणी आणि व्हिडिओ घृणास्पद, निर्लज्ज, विचित्र आणि वाईट होत चालले आहेत…” तर एकाने लिहिले, “#नेहा कक्कर काय करत आहे? तिने आणखी तरुण दिसण्यासाठी शस्त्रक्रिया केली का? आणि ती कोरियन असल्याचा बनाव का करत आहे?” अशा अनेक कमेंट्स करत तिला ट्रोल करण्यात येत आहे. एकंदरीतच प्रेक्षकांनी तिचे हे गाणे फारसे पसंतीस पडले नसल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा :
कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार
सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?