सरत आलेलं 2025 हे वर्ष खूप काही दाखवून गेलं, या वर्षात अनेक गोष्टी, दुर्दैवी घटना,(lucky) अपघात घडले, तर काही चांगल्या गोष्टीही घडल्याचे समोर आलं. आता हे 2025 वर्ष संपायला अवघे काहीच दिवस उरले आहेत. 2025 हे वर्ष काही लोकांसाठी चांगलं होतं, तर काही लोकांसाठी ते अतिशय त्रासदायक आणि काहींसाठी खूप आव्हानात्मक होतं. त्यामुळे आता जे झालं ते गेलं, असा विचार करून प्रत्येकजण येणाऱ्या 2026 या वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 मध्ये काही अशा जन्मतारखा आहेत, ज्या त्या दिवशी जन्मलेल्यांना खूप भाग्यवान ठरतील.

अंकशास्त्रानुसार, 1,10, 19, 28 या तारखेला जन्मलेल्यांसाठी 2026 हे वर्ष सर्वात भाग्यवान आहे,(lucky)कारण हे वर्ष ‘रवि’ चे वर्ष आहे, जे नेतृत्व आणि प्रगती आणते. तसेच मूलांक 3 अंक म्हणजेच 3, 12, 21, 30 आणि 5 अंक म्हणजेच5, 14, 23 अशा तारखांना जन्म झालेले लोक करिअर, पैसा आणि वैयक्तिक विकासासाठी भाग्यवान ठरतील.

मूलांक 1 सूर्य – 1, 10, 19, 28 या तारखा खूर चांगल्या आणि भाग्यवान आहेत. या तारखांना जन्मलेल्यांना 2026 हे वर्ष ऊर्जा, आत्मविश्वास आणि नेतृत्व देणारे असण्याची शक्यता आहे आणि ते करिअरच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक बळकटीसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतं.

मूलांक 3 गुरू – 3, 12, 21, 30 या तारखेला जन्मलेल्या लोकांनाही2026 मध्ये खूप फायदा होईल. या तारखा करिअरमध्ये प्रगती, परदेशात नफा आणि आध्यात्मिक कार्यांसाठी संधी देऊ शकतात.

मूलांक 5 बुध – 5, 14, 23 या तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे,(lucky) त्या लोकांसाठी 2026 हे वर्ष खूप चांगलं ठरू शकतं. 2026 मध्ये, या राशींना प्रगती, संचार क्षेत्रातून नफा, गुंतवणुकीतून परतावा मिळेल आणि त्यांच्या लव्ह लाईफमध्ये सुसंवाद साधण्याच्या संधी मिळतील.2026 साठीची भाकितं ही मिश्र आहेत. ज्योतिष आणि अर्थशास्त्रानुसार, हे वर्ष काही राशींसाठी प्रगतीचे वर्ष असू शकते, मात्र ही भाकितं अंदाजे आहेत आणि वास्तव वेगळे असू शकते.

हेही वाचा :

कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार

सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *