राज्यातील कथित ड्रग्स प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(involved)यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. या प्रकरणात प्रकाश शिंदे यांचे नाव समोर येत असून ते एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. “ही पत्रकार परिषद कोणत्याही राजकीय पक्षाच्या चौकटीत नाही, तर राज्याच्या भवितव्याशी संबंधित आहे,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे थेट सुरक्षेची मागणी केली.सुषमा अंधारे म्हणाल्या की, “माझ्यावरही कारवाई होऊ शकते याची भीती आहे. याआधी उके, नवाब मलिक यांच्याबाबत जे घडलं ते राज्याने पाहिलं आहे.” त्यांनी सांगितले की 13 तारखेला ड्रग्स संदर्भात एकूण तीन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या असून वर्धा, मुलुंड आणि पुण्यात या कारवाया झाल्या आहेत. यापैकी एक महत्त्वाची कारवाई साताऱ्याजवळील सावरी गावात झाली आहे

सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, सावरी गावातील कारवाईत तब्बल 45 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले (involved)असून त्याची किंमत सुमारे 115 कोटी रुपये आहे. “मी स्वतः त्या गावात जाऊन परिस्थिती पाहिली आहे,” असा दावाही त्यांनी केला. त्या ठिकाणी असलेला रिसॉर्ट हा प्रकाश शिंदे यांच्या मालकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शेडमध्ये ड्रग्स सापडले, तो गोविंद शिंदकर यांच्या मालकीचा असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात ओमकार डीगे याच्याकडे त्या शेडची चावी होती. त्याला अटक करून नंतर सोडून देण्यात आल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला. “या सगळ्या प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.(involved) “कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की FIR हा सार्वजनिक दस्तऐवज आहे. मग ही FIR ऑनलाइन का उपलब्ध नाही?” असा सवाल त्यांनी केला. पोलिसांनी काढलेल्या प्रेस नोटमध्ये तीन नावे जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कायम सय्यद, हाबीजुल इस्लाम आणि खलील रेहमान ही नावे समोर का येऊ दिली नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला.अंधारे यांनी पुढे सांगितले की, या शेडमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना जेवण हे प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून पुरवले जात होते. तसेच या रॅकेटमध्ये परप्रांतीय आणि बांगलादेशी नागरिकांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. “हे लोक इथे कसे आले, कुणी त्यांना आणलं आणि या सगळ्यावर प्रश्न का विचारले जात नाहीत?” असा सवाल करत त्यांनी या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
हेही वाचा :
कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार
सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?