आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे(protein)अनेकांना आवश्यक पोषण मिळत नाही. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून लोक वारंवार आजारी पडत आहेत आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत आहारात प्रथिनांचा योग्य समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.भारतीय आहारात डाळींना विशेष महत्त्व आहे. डाळी या प्रथिनांचा उत्तम वनस्पती-आधारित स्रोत असून शाकाहारी लोकांसाठी त्या अत्यंत उपयुक्त ठरतात. शरीराला आवश्यक असणारे अमिनो ॲसिड्स डाळींमधून मिळतात, ज्यामुळे स्नायूंची वाढ आणि दुरुस्ती होते. तसेच डाळींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

डाळी लोह आणि फोलेटचा देखील चांगला स्रोत मानल्या जातात. (protein)लोहामुळे ॲनिमियाचा धोका कमी होतो, तर फोलेट पेशींच्या विभाजनासाठी तसेच गर्भधारणेदरम्यान बाळाच्या योग्य विकासासाठी आवश्यक असते. डाळींचे नियमित सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शाकाहारी व्यक्तींनी प्रथिनांची गरज भागवण्यासाठी डाळींचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.यामध्ये मसूर डाळीला विशेष महत्त्व दिले जाते. मसूर ही लाल डाळ म्हणून ओळखली जाते आणि ती प्रथिने, लोह, फायबर, खनिजे तसेच कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असते.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मसूर डाळीपासून तयार केलेले पदार्थ हे चिकन (protein) किंवा मटणाच्या तुलनेत अधिक आरोग्यदायी पर्याय ठरू शकतात.मसूरची डाळ तयार करताना प्रथम ती स्वच्छ धुऊन कुकरमध्ये पाणी, मीठ आणि आले घालून मऊ होईपर्यंत शिजवली जाते. दुसरीकडे कढईत तेल गरम करून जिरे आणि तमालपत्र घातले जाते. त्यानंतर टोमॅटो घालून तेल वेगळे होईपर्यंत परतले जाते. हिरव्या मिरच्या, गरम मसाला, धणे पावडर आणि लाल मिरची पावडर घालून हे मिश्रण चांगले मिसळले जाते. शेवटी शिजवलेली डाळ घालून मंद आचेवर काही वेळ उकळवली जाते आणि कोथिंबिरीने सजवून सर्व्ह केली जाते.

हेही वाचा :

कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

रोजगा हमी योजनेतून गांधींचं नाव हटवणार

सुप्रिया सुळे आता प्रफुल्ल पटेल अमित शहांच्या भेटीला, दिल्लीत काय घडतंय?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *