देशातील सर्वात श्रीमंत बार गर्ल कोण होती? ती एका रात्रीत किती रुपये कमवायची? असे अनेक प्रश्न पडतात. पण तुम्हाला माहिती आहे का एक काळ असा होता की एका बार गर्लचे लाखो दिवाने होते. अक्षरश: क्रिकेटपटूंपासून (cricketer)अनेकजण तिच्यावर फिदा होता. तिच्यावर एका रात्रीत लाखो रुपये उडवले जायचे. आता ती कोण होती चला जाणून घेऊया…सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रात 2005 पासून बंद असलेले डान्स बार पुन्हा एकदा गजबजणार आहेत.

हे बार बंद झाल्यामुळे येथे नाचणाऱ्या डान्सर्सनी दुबई आणि बँकॉकचा रस्ता धरला होता. मुंबईत एक काळ असा होता जेव्हा हे बार रात्रभर गजबजलेले असायचे आणि येथे काम करणाऱ्या बार गर्ल्सवर नोटांचा पाऊस पडायचा. त्या काळात एक बार गर्ल तर अशी होती की ती एका रात्रीत 90 लाख रुपयांची कमाई करायची. आता ही बार गर्ल नेमकी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

देशातील सर्वात श्रीमंत बार गर्लचे नाव तरन्नुम खान असे होते. तिने (बार बाला) खूप प्रसिद्धी आणि पैसा कमावला. तरन्नुमला देशातील सर्वात श्रीमंत बार बाला असेही म्हटले जाते. तिच्यावर एका रात्रीत 90 लाख रुपये उडवले गेले होते. आज आम्ही तुम्हाला तरन्नुमची संपूर्ण कहाणी सांगणार आहोत. चला जाणून घेऊया…मुंबईच्या अंधेरी भागात राहणाऱ्या तरन्नुमचे वडील एक छोटे दुकान चालवायचे. तरन्नुमच्या कुटुंबात तिचा भाऊ, बहीण यांच्यासह एकूण 6 जण होते.
या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या 6 जणांच्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह व्हायचा. 1992 मध्ये झालेल्या दंगलीत तरन्नुमचे घर आणि दुकान लुटले गेले. संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. त्यांना रिलीफ कॅम्पमध्ये राहण्याची वेळ आली. यानंतर या सगळ्या धक्क्याने तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जीव गेला. घरची आर्थिक परिस्थिती पाहता तरन्नुमला डान्स बारमध्ये काम करण्यास भाग पडले.यानंतर तरन्नुमने मुंबईच्या दीपा बारमध्ये काम सुरू केले. बारमध्ये काम करताना काही काळातच तरन्नुम इतकी प्रसिद्ध झाली की तिचा नाच पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येऊ लागले.
तरन्नुमवर एका रात्रीत लाखो रुपये लुटवणारे शेकडो लोक होते. याच लोकांमुळे तरन्नुम काही दिवसांतच मुंबईची करोडपती बार बाला बनली. तरन्नुमने वयाच्या 16व्या वर्षापासून बारमध्ये नाचण्याचे काम सुरू केले होते. तरन्नुमला मुंबईतील सर्वात सुंदर बार गर्ल असेही म्हटले जायचे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, स्टँप पेपर घोटाळ्याचा मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी हा तरन्नुमचा दीवाना होता. एका रात्री त्याने तरन्नुमवर 90 लाख रुपयांहून अधिक रक्कम लुटवली होती.
तेलगीच्या अटकेनंतर तरन्नुम गायब झाली असे नाही. ती पुन्हा एकदा चर्चेत आली जेव्हा आयकर विभागाच्या छाप्यात तिच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचे उघड झाले. तिच्या माहितीतील उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि संपत्तीतील गुंतवणुकीचा खुलासा झाला होता. आयटी अधिकाऱ्यांना तिच्या मोबाइल फोनमध्ये सट्टेबाज आणि एका श्रीलंकन क्रिकेटपटूचा(cricketer) टेलिफोन नंबर सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास आपल्या हाती घेतला. तरन्नुमवर कथितपणे क्रिकेट सट्टेबाजीचा रॅकेट चालवल्याचा आरोप लावण्यात आला होता. तिला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले होते. 2015 मध्ये 2 महिने तुरुंगात घालवल्यानंतर तिला जामिनावर सोडण्यात आले होते.
हेही वाचा :
जन्माष्टमीच्या दिवशी हे उपाय केल्याने मुलांना मिळेल अपेक्षित यश
PM किसानचा 21 वा हप्ता कधी येणार? महत्वाची माहिती समोर
जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका