डिसेंबर महिन्याचे शेवटचे १० दिवस उरले आहेत. डिसेंबर महिना संपत आला(postponed)तरीही अजून नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आला नाहीये. नोव्हेंबरसोबत डिसेंबरचा हप्तादेखील कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता त्यात हे हप्ते लांबणीवर जाणार असल्याचे बोलले जात आहे.नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची वाट लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहत आहेत. त्यातच आता जानेवारीचा हप्तादेखील एकत्र येऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. जर हे तिन्ही हप्ते एकत्र आले तर महिलांना ४५०० रुपये मिळणार आहेत. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाईल.

जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. (postponed)राज्यात उद्या नगरपरिषद आणि नगपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यानंतर निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. त्यामुळे या कालावधीत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. यामुळेच जानेवारी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना लाभ घ्यायचा असेल तर केवायसी अनिवार्य केले आहे. (postponed)केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत आहे. त्याआधी जर तुम्ही केवायसी केले तरच तुम्हाला त्यापुढचा लाभ मिळणार आहे. अन्यथा लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाणार आहे. महिलांना ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायची आहे. तुम्ही मोबाईल किंवा स्मार्टफोनवरुन केवायसी करु शकतात.
हेही वाचा :
लिव्ह-इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर बातमीचा पाऊस
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूम सेल्फी तुफान व्हायरल; फोटो पाहून चाहते थक्क