भारती सिंह हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. आपल्या कॉमेडिच्या (age)माध्यमातून भारती सर्वांना पोटधरून हसवते. गेल्या अनेक वर्षांपासून व्लॉगिंगच्या माध्यमातून भारती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा लेक गोला अर्थात लक्ष्य हा देखील फेमस आले. पापाराझी यांच्यासोबत कायमच गोला गप्पा मारताना दिसलो. गोलाच्या जन्मापासून ते आतापर्यंत सर्वकाही दाखवण्याचा प्रयत्न भारती सिंह करते. गोला देखील व्लॉगिंग करताना दिसतो. विदेशात असो किंवा कुठेही आपल्या चाहत्यांसाठी खास अपडेट शेअर करताना भारती सिंह दिसते. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. काही दिवसांपूर्वीच भारती सिंह हिने जाहीर केले होते की, ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. प्रेग्नंसीमध्येही भारती काम करताना दिसली.

नुकताच आलेल्या माहितीनुसार, भारती सिंह हिने बाळाला जन्म दिला (age)असून भारतीला मुलगा झाला आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे भारती सिंह शूटिंगसाठी सेटवर पोहोचली होती. यादरम्यानच तिला त्रास होण्यास सुरूवात झाली. लगेचच भारती सिंहला रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी भारती सिंह हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून गोला आता मोठा भाऊ झाला आहे.

अनेकदा व्हिडीओमध्ये भारती सिंह बोलताना दिसली की, (age)मला मुलगी पाहिजे मुलगा नको. मात्र, पुन्हा एकदा भारती सिंह हिने मुलालाच जन्म दिला. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी दोघांनीही अत्यंत खास पद्धतीने ही गोड बातमी सर्वांना दिली होती. कुटुंबातील सदस्यांना विदेशात नेले आणि तिथे त्यांनी पर्वत रांगामध्ये खास निसर्गाच्या सानिध्यात जाहीर केले की, ते पुन्हा एकदा आई वडील बनणार आहेत.भारती सिंह हिने बाळाला जन्म दिल्याचे कळताच काैतुकांचा वर्षा केला जात आहे. अनेकांनी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना शुभेच्छा दिल्या. अजून भारती सिंह किंवा हर्ष लिंबाचिया यांच्याकडून बाळाबद्दलची अपडेट शेअर करण्यात आली नाहीये. मात्र, सकाळीच भारतीने मुलाला जन्म दिला. आता भारती बाळालाचा फोटो कधी शेअर करते याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता बघायला मिळत आहे.

हेही वाचा :

लिव्ह-इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर बातमीचा पाऊस

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूम सेल्फी तुफान व्हायरल; फोटो पाहून चाहते थक्क

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *