नवीन कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक (facelift) दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2026 हे वर्ष SUV प्रेमींसाठी खास ठरणार असून, विशेषतः महिंद्राच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण Mahindra & Mahindra आपली लोकप्रिय SUV Scorpio N Facelift लवकरच भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. दमदार लूक, मजबूत बॉडी आणि ऑफ-रोडिंग क्षमतेमुळे स्कॉर्पिओ N आधीपासूनच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.महिंद्रा स्कॉर्पिओ N चे फेसलिफ्ट मॉडेल 2026 च्या अगदी सुरुवातीलाच लॉन्च होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ही अपडेटेड SUV जानेवारी 2026 मध्ये भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. कंपनीसाठी हा मिड-लाइफ अपडेट अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, नव्या फीचर्समुळे स्कॉर्पिओ N अधिक प्रीमियम सेगमेंटमध्ये पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फेसलिफ्ट स्कॉर्पिओ N च्या बाह्य डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल (facelift)पाहायला मिळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, SUV मध्ये नवीन LED हेडलॅम्प्स, रिडिझाइन्ड टेललाइट्स आणि अधिक आकर्षक फॉग लॅम्प्स देण्यात येणार आहेत. यामुळे गाडीचा लूक अधिक आधुनिक आणि आक्रमक होईल. याशिवाय, नवीन ट्रिम एलिमेंट्स आणि फ्रेश अलॉय व्हील डिझाइनही मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अलॉय व्हीलचा साइज सध्याप्रमाणेच 18-इंच ठेवण्यात येईल, असा अंदाज आहे. या बदलांमुळे Scorpio N Facelift रस्त्यावर अधिक प्रीमियम आणि स्टायलिश दिसेल.
इंटीरियरबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली,(facelift) तरी महिंद्राच्या अलीकडील मॉडेल्सचा विचार करता मोठे अपडेट्स अपेक्षित आहेत. सध्याच्या 8-इंच टचस्क्रीनऐवजी 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात येऊ शकते.यासोबतच थ्री-रो सीटिंग लेआउट, ADAS सेफ्टी फीचर्स, 12-स्पीकर Sony साउंड सिस्टम आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलसारखी प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पॉवरट्रेनमध्ये कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही.

फेसलिफ्ट स्कॉर्पिओ N मध्ये सध्याप्रमाणेच 2.0-लीटर टर्बो पेट्रोल (facelift)आणि 2.2-लीटर डिझेल इंजिनचे पर्याय दिले जातील. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असतील. डिझेलच्या टॉप व्हेरिएंट्समध्ये 4×4 ड्राइव्ह सिस्टमही कायम राहणार आहे. किंमतीबाबत बोलायचे झाले, तर फेसलिफ्ट Mahindra Scorpio N ची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 14 लाख ते 26 लाख रुपयांदरम्यान असू शकते. नव्या डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्समुळे ही SUV पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठी खळबळ उडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
लिव्ह-इन रिलेशनशिप बेकायदेशीर नाही उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर बातमीचा पाऊस
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूम सेल्फी तुफान व्हायरल; फोटो पाहून चाहते थक्क