तुम्हाला आता विमानातले नियम ट्रेनमध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको.(trains) तुम्ही अनेकदा भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. वास्तविक, आयआरसीटीसीने आता रेल्वेमध्ये सामान घेऊन प्रवास करण्यासाठी नवीन नियम आणले आहेत. या नव्या नियमानुसार, लोकांना विमानतळाप्रमाणेच ट्रेनमध्ये सामान वाहून नेण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, जर एखादा प्रवासी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास करत असेल तर त्याला विमान प्रवासाप्रमाणेच अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.

ज्याप्रमाणे विमानतळावर एका मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेल्यास तुम्हाला(trains) अतिरिक्त शुल्क द्यावे लागत आहे, त्याच प्रमाणे आता रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान सामान वाहून नेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क आकारावे लागणार आहे. सध्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डब्यानुसार क्लास सामानाची कमाल मर्यादा आहे. प्रवासी निर्धारित मर्यादेपर्यंत डब्यात सामान घेऊन जाऊ शकतात. यात मोफत भत्त्याचाही समावेश आहे. जर प्रवाशांनी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेले तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ही मर्यादा काहीशी अशी आहे.
ट्रेनमध्ये सामान वाहून नेण्याची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे
एसी फर्स्ट क्लास – 150 किलो
प्रथम श्रेणी – 100 किलो
एसी 3 टायर – 40 किलो
स्लीपर क्लास – 80 किलो
द्वितीय श्रेणी – 70 कि.ग्रा.
मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेण्यासाठी किती शुल्क?
प्रवाशांनी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन ट्रेनमध्ये प्रवास केला(trains)तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यासाठी त्यांना लगेज रेटच्या 1.5 पट फी भरावी लागेल. हे शुल्क केवळ वर्गानुसार निश्चित केलेल्या कमाल मर्यादेपर्यंतच लागू आहे. रेल्वेच्या

नियमांनुसार, प्रवासी ट्रंक, सूटकेस आणि बॉक्स घेऊन जाऊ शकतात,(trains)ज्याचा जास्तीत जास्त आकार 100 सेमी x 60 सेमी x 25 सेमी असावा. ट्रंक, सुटकेस किंवा बॉक्सचा आकार या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास प्रवासी त्यांना ट्रेनमध्ये नेऊ शकणार नाहीत. ब्रेक व्हॅन किंवा पार्सल व्हॅनमध्ये असा माल बुक करणे आवश्यक असेल. या व्यतिरिक्त, प्रवाशांसाठी वैयक्तिक सामान म्हणून डब्यामध्ये व्यवसायाशी संबंधित वस्तू नेण्याची परवानगी नाही.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या