नगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता कोल्हापूर आणि इचलकरंजी (elections)महापालिकांच्या निवडणुकांचा थरार सुरू होत आहे. (elections), ता. २३ पासून या दोन महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार असून, कोल्हापूरमध्ये २० तर इचलकरंजीमध्ये १६ प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.दोन टप्प्यांत झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी रविवारी पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापालिकांच्या निवडणुकांकडे वळले आहे. मंगळवारपासून ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र या कालावधीत ख्रिसमस आणि रविवारची सुटी असल्याने प्रत्यक्षात उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी केवळ सहाच दिवस उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर महापालिकेसाठी निवडणूक प्रशासनाने तयारी सुरू केली असून,(elections) प्रत्येकी तीन प्रभागांसाठी एक निवडणूक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. चार सदस्यीय आणि पाच सदस्यीय प्रभागांसाठी स्वतंत्र कार्यालये उभारण्यात आली असून, एकूण सात निवडणूक कार्यालयांमधून अर्ज विक्री आणि स्वीकाराची प्रक्रिया पार पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, त्यानंतर दोन दिवस माघारीसाठी देण्यात आले आहेत. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे, तर ३ जानेवारी रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून जागावाटप आणि उमेदवार निश्चितीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात असून, उपसमित्यांमार्फत त्यांच्या उमेदवारीची पडताळणी केली जात आहे. उमेदवारीचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांवर दबाव वाढला आहे.

प्रशासन पातळीवरही तयारी सुरू असून, निवडणूक कार्यालयांसाठी आवश्यक (elections)अधिकारी, कर्मचारी, विविध पथके आणि यंत्रणा उभी केली जात आहे. मात्र अद्याप काही कर्मचारी हजर झालेले नाहीत तसेच वाहनेही उपलब्ध झालेली नाहीत. यासाठी कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात येत असून, वाहनांची व्यवस्था करण्यासाठी आरटीओची मदत घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. एकूणच, कोल्हापूर आणि इचलकरंजीत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातक