जेम्स कॅमेरॉनचा “अवतार: फायर अँड अॅशेस” हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी (theaters)चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याने रिलीज आधीच चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीवरून आणि पहिल्या दिवसाच्या कलेक्शननुसार .या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाभोवती होणारी प्रशंसा आणि चर्चा पाहता हा चित्रपट येत्या काळात विक्रमी कमाई करु शकतो.”अवतार: द वे ऑफ वॉटर” च्या प्रदर्शनानंतर तीन वर्षांनी, जेम्स कॅमेरॉन तिसऱ्या भागासह “अवतार: फायर अँड अॅशेस” परतला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि असे दिसते की त्यांची वाट पाहणे सार्थकी लागले आहे. “अवतार ३” ला “मास्टरपीस” म्हणून गौरवण्यात येत आहे. एका नेटकऱ्याने हा चित्रपट ऑस्करसाठी पात्र असल्याचे सांगितले आहे.

या चित्रपटाबद्दल सांगताना एका नेटकऱ्याने कमेंट केली, (theaters)’अवतार: फायर अँड ॲश’ जबरदस्त ॲक्शनने भरलेला आहे. हा चित्रपट नक्कीचं लोकांना फार आवडेल. आणखी एकाने पोस्ट करत लिहीले, मी हा चित्रपट पाहताना ५ वेळा रडले. त्यातील काही भाग खरचं खूप भावूक करणारे आहेत.सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘अवतार: फायर अँड अॅशेस’ भारतात २० कोटी रुपयांची कमाई करू शकतो. व्हरायटीच्या अहवालानुसार, ‘अवतार ३’ अमेरिकेत ९० दशलक्ष ते १०५ दशलक्ष डॉलर्स अंदाजे ९ अब्ज रुपये कमाई करण्यास सज्ज आहे.

भारतीय बॉक्स ऑफिसवर, तो आदित्य धरच्या ‘धुरंधर’ला मागे टाकू शकतो, (theaters)जो गेल्या १४ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे.”अवतार” चे पुढील दोन भाग २०२९ आणि २०३१ मध्ये प्रदर्शित होतील. “अवतार: फायर अँड अॅशेस” १७ डिसेंबर रोजी जर्मनी आणि फिलीपिन्समध्ये प्रदर्शित झाला आणि आता १९ डिसेंबर रोजी भारतासह उर्वरित जगात प्रदर्शित झाला. या फ्रँचायझीमधील आणखी दोन चित्रपट २०२९ आणि २०३१ मध्ये प्रदर्शित होतील. सध्या या दोन्ही भागांवर काम सुरु आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या