तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांनी 2025 च्या सुरुवातीलाच एकमेकांना(boyfriend)डेट करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला दोघांनी आपलं नातं खूपच खासगी ठेवलं होतं. ते शांतपणे भेटत होते आणि काही वेळा एकत्र दिसले असले तरी त्यांनी अधिकृतपणे काहीही जाहीर केलं नव्हतं. अखेर जुलै 2025 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत शिक्कामोर्तब केलं.अलीकडेच तारा आणि वीर हे दोघेही प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लोंच्या मुंबईतील कॉन्सर्टला उपस्थित होते. या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यातील एका खास व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये एपी ढिल्लों तारा सुतारियाला थेट स्टेजवर बोलावताना दिसतो तर खाली उभा असलेला वीर पहाडिया हे सगळं पाहत राहतो.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तारा खूपच सुंदर दिसत होती.(boyfriend) ती स्टेजवर पोहोचताच कॉन्सर्टचा माहौल अधिकच रंगतदार झाला. स्टेजवर जाताच एपी ढिल्लोंने तारा सुतारियाला मिठी मारली आणि तिच्या गालावर किस केला. हाच क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये तारा या सगळ्या प्रसंगात कम्फर्टेबल असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.या दरम्यान तारा आणि एपी ढिल्लों यांच्यात थोडी बातचीतही झाली. तर दुसरीकडे खाली उभा असलेला वीर पहाडिया सतत ताराकडे लक्ष ठेवून पाहताना दिसतो. काही प्रेक्षकांना त्याची प्रतिक्रिया अगदी सामान्य वाटली, मात्र अनेक सोशल मीडिया युजर्सनी वीरच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या हावभावांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
यानंतर तारा आणि एपी ढिल्लों स्टेजवर एकत्र डान्स करतानाही दिसले. (boyfriend)एपी आपल्या हिट गाण्यांवर परफॉर्म करत होता आणि तारा त्याच्यासोबत ठेका धरताना दिसली. एका सीनमध्ये तर ताराने एपीच्या खांद्यावर हात ठेवलेला देखील पाहायला मिळतो. या संपूर्ण प्रसंगामुळे कॉन्सर्टचं वातावरण अत्यंत एनर्जेटिक झालं होतं. प्रेक्षकही हा खास क्षण मोबाईलमध्ये टिपण्यात व्यस्त होते.व्हायरल व्हिडीओमध्ये वीर पहाडियाही दिसतो, जो स्टेजकडे पाहत एपी ढिल्लोंचं गाणं लिप-सिंक करताना दिसतो. मात्र, अनेक युजर्सच्या मते वीर या क्षणी थोडा अस्वस्थ आणि तणावात असल्यासारखा वाटत होता. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी लिहिलं की, एपी ढिल्लों ताराच्या खूप जवळ जात असताना वीर स्पष्टपणे अस्वस्थ दिसत होता.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका