“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार टॅगलाईनसह बिग बॉस(game)मराठी सिझन ६ चा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकतेची लाट निर्माण केली आहे. रितेश भाऊंच्या कडक अंदाजात सादर झालेल्या या प्रोमोमुळे यंदाचा सीझन केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता खेळाडूंचं नशीबच बदलणारा ठरणार, असा स्पष्ट इशारा मिळतोय. बिग बॉस मराठीचा सहावा सीझन ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टार वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्याआधीच रिलीज झालेल्या या प्रोमोने चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. “फॅन्सचा जीव जडला की ते पाठ सोडत नाहीत… आणि आपण शब्द दिला की मागे हटत नाही,” अशा प्रभावी संवादांतून रितेश भाऊंनी या सिझनचा सूर ठरवून दिला आहे.

प्रोमोमधील मुख्य आकर्षण म्हणजे घराची भव्य आणि रहस्यमय रचना. (game)शेकडो दारखिडक्यांनी सजलेलं घर, दारापल्याड दडलेली अनपेक्षित सरप्राइझेस आणि क्षणाक्षणाला बदलणारा खेळ – हे सगळं यंदाच्या थीमचं वैशिष्ट्य ठरणार आहे. प्रत्येक दार उघडलं की नवा ट्विस्ट समोर येणार असून कोण पास होणार आणि कोण फेल, हे एका क्षणात ठरू शकतं.रितेश भाऊ प्रत्येक सीझनमध्ये प्रोमोमधून काहीतरी वेगळं सादर करत आले आहेत.

कधी हटके लूक, कधी खास स्वॅग, तर कधी कोड्यातून सांगितलेली थीम(game) – यंदाही त्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.“ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ,” या ओळी आधीच सोशल मीडियावर व्हायरल होण्याची चिन्हं दिसत आहेत.घर कसं असेल, दारापलीकडे नक्की काय दडलंय, खेळाडूंना कोणते धक्के बसणार आणि कोणाचं नशीब फळफळणार हे सगळे प्रश्न सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठी सिझन ६ हा महाराष्ट्राला खिळवून ठेवणारा ठरणार, यात शंका नाही.

हेही वाचा :

पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत

१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते

घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *