शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती गाव आणि परिसरात(accidents) १४ ऑगस्ट रोजी दोन भीषण रस्ते अपघात घडले. या दोन वेगळ्या घटनांत एक महिला आणि एक ज्येष्ठ नागरिक यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. दोन्ही अपघातांत धडक देणारी वाहने घटनास्थळावरून पळून गेल्याने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अहिल्यानगर महामार्गावरील खंडाळे माथा येथे मातोश्री हॉटेलजवळ सकाळी घडली. मोटारसायकलवरून जात असताना एका अज्ञात वाहनचालकाने अचानक कट मारला.

यामुळे मोटारसायकलवरील ज्येष्ठ प्रवासी मारुती लक्ष्मण ताम्हाणे (वय ६९, रा. खराडी, पुणे) यांचा तोल जाऊन गंभीर अपघात झाला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मागील सीटवर बसलेल्या त्यांच्या पत्नी पोपट पर्वती ताम्हाणे (वय ६२) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. (accidents)अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम 106(1), 281, 125(a)(b) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पासलकर, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गणेगाव–रांजणगाव रस्त्यावर मस्के बिल्डिंगसमोर आणखी एक गंभीर अपघात घडला. राधा सुरेश बागल (वय ६५, रा. संकल्प सिटी, रांजणगाव) शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. दरम्यान, मागून आलेल्या एका भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की त्या जागीच कोसळल्या आणि मृत्यू पावल्या. धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची तक्रार मृत महिलेचे नातलग सुनील बागल यांनी रांजणगाव पोलिसांकडे नोंदवली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत असून, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.

या दोन घटनांव्यतिरिक्त, पुणे शहरातील कोरेगाव पार्क भागात १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एक विचित्र आणि धक्कादायक अपघात झाला. (accidents)दुचाकीवर मैत्रिणीला बसवून प्रवास करणाऱ्या शिवम नावाच्या तरुणाला मागून आलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या धडकेमुळे शिवम आणि त्याची मैत्रीण रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येत असलेल्या टेम्पोने शिवमला चाकाखाली घेतले. अपघातात शिवम गंभीर जखमी झाला, तर त्याची मैत्रीण किरकोळ जखमी झाली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू झाला. घटनेनंतर टेम्पो चालक आणि धडक देणारा दुचाकीस्वार दोघेही फरार झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे. या तिन्ही अपघातांतील दोषींना पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून माहिती, तसेच वाहतूक विभागाच्या नोंदींचा आधार घेऊन तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घटनांशी संबंधित कुणालाही काही माहिती असल्यास तातडीने पोलिस ठाण्यात कळवावी.

हेही वाचा :

Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात
‘कहीं आग लगे लग जावे….सानिया मिर्झा कुणाच्या आठवणीत झुरतेय
भल्याभल्यांना नादाला लावणारी बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *