युपीआयच्या माध्यमातून दररोज कोट्यवधी व्यवहार होत असताना अनेक(shoppers)ग्राहकांच्या खात्यातून दर महिन्याला नकळत पैसे कापले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. विशेषतः ई-कॉमर्स अॅप्स, ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि विविध डिजिटल सेवांशी संबंधित सबस्क्रिप्शनमुळे ग्राहक ऑटोपेमेंटमध्ये अडकत असल्याचं चित्र दिसत होतं. या पार्श्वभूमीवर सरकार आणि NPCI कडून मोठा बदल करण्याची तयारी सुरू असून, यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. नवीन नियमांनुसार, UPI Autopay च्या माध्यमातून होणाऱ्या सबस्क्रिप्शन फी आणि नियमित शुल्कावर नियंत्रण आणलं जाणार आहे. हे बदल लागू झाल्यानंतर ग्राहकांच्या खात्यातून कोणतीही रक्कम आपोआप कापली जाण्यापूर्वी त्यांना स्पष्ट माहिती मिळणार असून, अनावश्यक कटऑफ आणि अतिरिक्त शुल्क भरण्यापासून दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने UPI Autopay सबस्क्रिप्शनशी संबंधित नियम (shoppers)अधिक कडक केले आहेत. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. युपीआय नेटवर्कशी संबंधित सर्व ग्राहक आणि व्यावसायिकांना या बदलांचा थेट परिणाम जाणवणार असून, विशेषतः ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वापरले जाणारे तथाकथित ‘डार्क पॅटर्न’ आता आळा बसणार असल्याचं मानलं जात आहे.
NPCI ने ‘upihelp.npci.org.in’ नावाचं एक नवीन सेंट्रल पोर्टल सुरू केलं आहे(shoppers) या पोर्टलच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या सर्व सक्रिय UPI Autopay सेटिंग्ज एकाच ठिकाणी पाहू आणि व्यवस्थापित करू शकतील. कोणत्या अॅपला किती रक्कम दरमहा जात आहे, कोणतं सबस्क्रिप्शन सुरू आहे किंवा बंद आहे, याची संपूर्ण माहिती आता सहज उपलब्ध होणार आहे.
UPI New Rule | ३१ डिसेंबरपासून अंमलबजावणी, ग्राहकांना मोठा दिलासा :
NPCI कडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, हे नवीन नियम सर्व UPI अॅप्सवर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लागू करण्यात येणार आहेत. यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना त्यांच्या ऑटोपेमेंट्सवर पूर्ण नियंत्रण मिळणार आहे. विशेष म्हणजे, ग्राहक आता एकाच UPI अॅपवरून दुसऱ्या अॅपवर ऑटोपेमेंट पोर्ट करू शकतील, मात्र त्यासाठी UPI PIN अनिवार्य असेल आणि ९० दिवसांतून केवळ एकदाच असा बदल करता येणार आहे.

या नियमांमुळे अॅप्स ग्राहकांना कॅशबॅक किंवा आमिष दाखवून वारंवार(shoppers) अॅप बदलण्यासाठी भाग पाडू शकणार नाहीत. ऑटोपे संदर्भातील डेटा केवळ माहिती दर्शवण्यासाठीच वापरण्यात येणार असून, इतर कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी त्याचा गैरवापर करता येणार नाही. एकंदरीत, NPCI च्या या नव्या निर्णयामुळे UPI वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार असून, अनावश्यक शुल्क आणि डिजिटल फसवणूक रोखण्यात हा बदल निर्णायक ठरणार आहे.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका