कोल्हापुरातील एका तरुणावर तमिळनाडूमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात (instant) आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियासाठी रील बनवण्यास विरोध केल्यानं काही अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. तरुणाच्या हात, पाय, डोकं आणि शरीरावर कोयत्याने अनेक वेळा वार करण्यात आले. दीड मिनिटांमध्ये ७२ वेळा कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तमिळनाडूमधील तिरुवल्लूर जिल्ह्यात ही धक्कादायक आणि (instant) संतापजनक घटना घटना घडली. सोशल मीडियासाठी रील बनवण्यास विरोध केला म्हणून महाराष्ट्रातील एका स्थलांतरित कामगारावर अल्पवयीन मुलांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत हा तरुण रेल्वे स्थानकाच्या भिंतीजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी काही तासांत आरोपींना अटक केली

पोलिसांनी सांगितले की, तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील (instant) थिरुथणी रेल्वे स्थानकाजवळ ही धक्कादायक घटना घडली. कोल्हापूर येथील रहिवासी असलेला ३४ वर्षीय सूरज नावाचा तरुण चेन्नईहून इलेक्ट्रिक ट्रेनने प्रवास करत होता. याचवेळी चार अल्पवयीन तरुणांनी त्याच्या गळ्याजवळ कोयता धरून रील शूट करण्याचा प्रयत्न केला. सूरजने त्यांना तीव्र विरोध केला आणि याच रागातून अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. सूरजचे हात, पाय, डोकं आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आले.जखमी अवस्थेत सूरज रेल्वे स्थानकाच्या भिंतीजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. प्रवाशांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी प्रथमोपचार करून त्याला थिरुथणी सरकारी रुग्णालयात दाखल केले. (instant) मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला तिरुवल्लूर सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. तो सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही अल्पवयीन आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा विकृत प्रकार किती टोकाला गेला याचं हे भयावह उदाहरण आहे. या घटनेनंतर अल्पवयीन गुन्हेगारी आणि सोशल मीडियावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *