भारतीय रेल्वे आणि IRCTC ने 2025 च्या अखेरीस रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये (ticket) मोठा बदल केला आहे. आता आधारवरून सत्यापित IRCTC खाते असलेल्या प्रवाशांना सामान्य राखीव तिकीट बुक करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.हा नवीन नियम अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड उघडण्याच्या दिवशी लागू होईल. बनावट खात्यांना आळा घालणे आणि खऱ्या प्रवाशांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढविणे हा रेल्वेचा उद्देश आहे. याची अंमलबजावणी 29 डिसेंबर 2025 पासून टप्प्याटप्प्याने केली जात आहे. 12 जानेवारी 2026 पर्यंत ती पूर्ण 16 तासांची विशेष खिडकी असेल.

रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, 29 डिसेंबर 2025 पासून ARP च्या पहिल्या दिवशी (ticket) सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत केवळ तेच प्रवासी ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील, ज्यांचे IRCTC खाते आधारशी जोडलेले आहे आणि सत्यापित आहे, म्हणजेच आधार प्रमाणीकरणाशिवाय युजर्स या काळात तिकीट बुक करू शकणार नाहीत. अशा प्रवाशांना दुपारी 12 नंतरच तिकीट बुक करता येणार आहे. यापूर्वी, सरकारने हे देखील स्पष्ट केले होते की 1 ऑक्टोबर 2025 पासून सामान्य आरक्षण उघडण्याची पहिली 15 मिनिटे केवळ आधार-प्रमाणित युजर्ससाठी असतील.

जानेवारी 2026 मध्ये हा नियम आणखी वाढविण्यात येणार आहे.(ticket) 5 जानेवारी 2026 पासून, ही विशेष विंडो सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत वाढवण्यात येईल, म्हणजेच केवळ आधार-संलग्न IRCTC युजर्स 8 तासांसाठी ऑनलाइन सामान्य राखीव तिकिटे बुक करू शकतील. यानंतर 12 जानेवारी 2026 पासून ही वेळ सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत म्हणजे पूर्ण 16 तासांपर्यंत वाढेल. पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या परिपत्रकानुसार, टप्प्याटप्प्याने विस्तार केला जात आहे जेणेकरून यंत्रणेवर दबाव येणार नाही आणि प्रवाशांना नवीन प्रणालीशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. मात्र, संगणकीकृत PRS काउंटरवरून तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

ज्या लोकांनी अद्याप आपले IRCTC खाते आधारशी लिंक करू शकलेले नाही (ticket) त्यांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असा सल्ला रेल्वेने प्रवाशांना दिला आहे. आधार लिंक करण्यासाठी प्रवाशांना IRCTC च्या वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवर लॉग इन करावे लागेल आणि ‘माय प्रोफाइल’ सेक्शनमध्ये जाऊन आधार क्रमांक जोडावे लागेल.आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना या विस्तारित बुकिंग विंडोचा लाभ घेता येईल. या निर्णयामुळे दलालांना आळा बसेल, तिकिटांचा काळाबाजार कमी होईल आणि सामान्य प्रवाशांना पूर्वीपेक्षा जास्त कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल, असा रेल्वेचा विश्वास आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! LPG वरील सबसिडी बंद होणार? तुमचा

चौथ्या मजल्यावर खिडकीत बाळ अडकलं; जीवाची पर्वा

90 टक्के आयफोन युजर्सना माहिती नाही हे गुप्त फिचर्स,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *