देशातील टॅक्सी सेवांच्या क्षेत्रात मोठा बदल घडवण्याची तयारी सुरू झाली (Taxi) असून, १ जानेवारीपासून ‘Bharat Taxi App’ हे नवे स्वदेशी अ‍ॅप अधिकृतपणे लाँच होत आहे. आतापर्यंत Ola आणि Uber या खासगी कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आता सरकारसमर्थित आणि देशी पर्याय उपलब्ध होणार असल्याने प्रवासी आणि चालक दोघांचेही लक्ष या नव्या अ‍ॅपकडे लागले आहे.Bharat Taxi App चे उद्दिष्ट पारदर्शक, परवडणारी आणि विश्वासार्ह टॅक्सी सेवा देणे हे आहे. या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना कोणतेही सरचार्ज, अचानक भाडेवाढ किंवा लपविलेले शुल्क आकारले जाणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात किंवा गर्दीच्या वेळी होणाऱ्या जादा दरांच्या समस्येला आळा बसण्याची शक्यता आहे.

टॅक्सी चालकांसाठीही हे अ‍ॅप फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.(Taxi) Ola आणि Uber मध्ये आकारले जाणारे जास्त कमिशन येथे कमी असणार असून, चालकांना थेट उत्पन्न मिळेल. यामुळे अनेक चालक या नव्या प्लॅटफॉर्मकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Bharat Taxi App मध्ये स्थानिक भाषांचा समावेश, सुरक्षिततेसाठी विशेष फीचर्स, तसेच ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध असणार आहे.

ग्रामीण आणि निमशहरी भागातही टॅक्सी सेवा पोहोचवण्याचा मानस असल्याने,(Taxi) हे अ‍ॅप केवळ महानगरांपुरते मर्यादित राहणार नाही.या नव्या अ‍ॅपमुळे Ola आणि Uber यांच्या मक्तेदारीला खरोखरच आव्हान मिळणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मात्र, १ जानेवारीपासून सुरू होणारी ही सेवा टॅक्सी क्षेत्रात स्पर्धा वाढवेल आणि त्याचा थेट फायदा प्रवाशांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह

हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?

कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *