बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.(killed) याठिकाणी आणखी एका हिंदू व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. जमावाने एका हिंदू व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. खोकोन दास ५० वर्षे हे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले. त्यानंतर जमावाने खोकोन दास यांना जिवंत जाळले. ही घटना ३१ डिसेंबरला म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंधघ्येला शरीयतपूर जिल्ह्यात घडली. या हल्ल्यात खोकोन दास यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शरीयतपूर जिल्ह्यात हिंदू औषध विक्रेता खोकोन (killed)दासवर जमावाकडून हल्ला करण्यात आला. दास आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी काही जणांनी धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोर ऐवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी दास यांच्या शरीरावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याआधी बांगलादेशमध्ये १८ डिसेंबर २०२५ रोजी मैमनसिंग जिल्ह्यातील (killed)भालुका येथे हिंदू कामगार दिपू चंद्र दास याच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केला होता. त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर भरचौकात एका झाडाला लटकवून त्याला जाळून टाकण्यात आले होते. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना अटक केली. या घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते.दरम्यान, २८ डिसेंबर रोजी पिरोजपूर जिल्ह्यातील डुमरितला गावात हिंदू कुटुंबांच्या घरांना आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चट्टोग्रामच्या राओजन भागात अनेक हिंदू घरांना लक्ष्य करण्यात आले होते. याठिकाणी अनेक हिंदू कुटुंबीयांच्या घराचे दरवाजे बंद करून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण सुदैवाने या घटनेत सर्वजण बचावले होते.

हेही वाचा :

नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह

हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?

कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *