कोल्हापुरातून एक अपघाताची घटना समोर आली आहे.(reported)पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल चौकात भीषण अपघाताची घटना घडली आहे. थंडीपासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला शेकोटी करत उभ्या असलेल्या तिघांना भरधाव इनोव्हा कारने चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तावडे हॉटेल चौक हा पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा वर्दळीचा परिसर आहे. मंगळवारी पहाटे काही जण थंडीमुळे रस्त्याच्या बाजूला थांबून शेकोटी करत होते. याच वेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं त्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना चिरडलं.

कारच्या धडकेत तिघेही दूर फेकले गेले अआणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.(reported)अपघातानंतर काही काळ महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काहींनी जखमींच्या मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. शाहूपुरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून उत्तरीय तपासणीसाठी तिघांचे मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवले. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त इनोव्हा कार ताब्यात घेतली असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.स्थानिक नागरिकांनी अपघात झालेल्या चौकात वेगमर्यादा, स्पीड ब्रेकर तसेच पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे..(reported) पोटच्या पोरानेच आपल्या आई वडिलांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. बांबूच्या दांडक्याने डोक्यावर वार करून, विळ्याच्या पात्याने मान आणि काचेच्या तुकड्याने हाताच्या नासा कापून निर्घृण हत्या केली. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नारायण गणपतराव भोसले वय ८२, विजयमाला नारायण भोसले ७० अशी मृतकाचे नाव आहे. तर आरोपीचे नाव सुनील नारायण भोसले ४८, रा. हुपरी, ता. हातकणंगले असे आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे. ही घटना हुपरी येथे घडली आहे

हेही वाचा :

नवीन वर्षात ओली पार्टी न पडो महागात! घरात किती दारु ठेवू शकता? दंडासह

हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक? काय सांगतात तज्ज्ञ?

कपडे काढ अन् नाच..; सेटवर अभिनेत्रीसोबत गैरवर्तन; दिग्दर्शकाची

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *