पुण्यातील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(danger) मात्र, कोल्हापूरमधील दोन तरुणांमुळे त्या तरुणीला सुखरूपपणे तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या दोन तरुणांचं कौतुक केलं जात आहे. कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडियावरील अनोळखी मैत्रीच्या धोक्यांकडे लक्ष वेधलं आहे.

पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीची सोशल मीडियावर एका तरुणाशी ओळख झाली होती. (danger)तो कोल्हापूरचा असल्याचं त्याने तिला सांगितलं. काही दिवसांतच त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. त्यानंतर त्याने तिला कोल्हापूरमध्ये भेटण्यासाठी बोलावलं. तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवत कोल्हापूर गाठलं. मात्र, कोल्हापूरमध्ये पोहोचताच त्याने दिलेला पत्ता खोटा असल्याचं तिच्या लक्षात आलं.त्यानंतर तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने पुन्हा खोटा पत्ता देत तिची फसवणूक केली. दरम्यान, मंगळवारी कसबा बावड्यातील एका ठिकाणी भेटण्याचं त्याने तिला सांगितलं. तरुणी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. मात्र, तासनतास वाट पाहूनही तो न आल्याने ती हताश झाली. अखेर त्या ठिकाणी बसून ती रडू लागली.

याच दरम्यान, टिपू मुजावर आणि ओंकार पाटील या दोन तरुणांनी तिला रडताना पाहिलं. (danger)त्यांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तरुणीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत तरुणीला ताब्यात घेतलं. तसेच तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तिला त्यांच्या स्वाधीन केलं. या घटनेची माहिती पुणे पोलिसांनाही देण्यात आली.
हेही वाचा :
नोकरीला कंटाळलात? 2026 मध्ये पैसे कमावण्याच्या या आहेत 5 बेस्ट आयडिया
२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली
Sangli Crime: कॉलेजसमोरुन निघाला, चौघांनी अडवलं अन्… सांगलीत 22