देशातील प्रत्येक वाहनधारकांकडे फास्टॅग असणे अनिवार्य आहेत.(FASTag)आता फास्टॅगच्या नियमात बदल केले जाणार आहे. आता फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य नसणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना सतत फास्टॅग केवायसी करावी लागणार नाहीये.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने वाहनांसाठी केवायसी प्रक्रिया बंद केली आहे.NHAI ने याबाबत घोषणा केली आहे. यामध्ये १ फेब्रुवारी २०२६ पासून नवीन वाहनांसाठी फास्टॅग केवायसी करावी लागणार नाहीये. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

याआधी जेव्हा कोणताही वाहनधारक नवीन FASTag खरेदी करत असेल (FASTag)तेव्हा त्याला केवायसी करावी लागत होती. यामध्ये अनेक समस्या येत होत्या. यामध्ये चुकीची माहिती, कागदपत्र पडताळणी यामध्ये अडचणी येत होत्या.त्यामुळेच आता सरकारने नवीन फास्टॅगसाठी स्वतंत्र केवायसीची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. वाहनांच्या रजिस्ट्रेनची पडताळणी केली जाणार आहे. फास्टॅग खरेदी करताना या सर्व माहितीची पडताळणी केली जाणार आहे.

जर तुमच्या वाहनांमध्ये फास्टॅग असेल तर तुम्हाला तुमचे केवायसी पुन्हा (FASTag)करण्याची गरज नाही. जर कोणत्याही तक्रारी नसतील तर फास्टॅग सर्व्हिस सुरु राहिली. परंतु जर चुकीच्या पद्धतीने फास्टॅग जारी केला असेल तर त्याची चौकशी केली जाणार आहे. बँकांना फास्टॅग करण्यापूर्वी संपूर्ण पडताळणी करावी लागणार आहे.

हेही वाचा :

नोकरीला कंटाळलात? 2026 मध्ये पैसे कमावण्याच्या या आहेत 5 बेस्ट आयडिया

२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली

२०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *